शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

समीरचा जामीन अर्ज फेटाळला

By admin | Updated: January 29, 2016 02:08 IST

ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येतील आरोपी व सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याचा जामीन अर्ज येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एल. डी. बिले

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येतील आरोपी व सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याचा जामीन अर्ज येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एल. डी. बिले यांनी गुरुवारी फेटाळला. सनातन संस्थेशी संबंधित ज्योती कांबळे, अंजली झरकर व सुनील खमितकर हे तिघे या खटल्यातील ‘सनातन’चे साक्षीदार आहेत. या साक्षीदारांना भेटून समीर त्यांच्यावर दबाव आणू शकतो, हा मुद्दा न्यायालयाने विचारात घेऊन, समीरचा जामीन अर्ज नामंजूर केला. या खटल्याची पुढील सुनावणी ९ फेबु्रवारी २०१६ रोजी होणार आहे.समीर गायकवाडच्या जामीन अर्जावर जिल्हा व सत्र न्यायालयात गुरुवारी सुनावणी होती. यासाठी सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांच्यासह अ‍ॅड. विवेक घाटगे, अ‍ॅड. प्रकाश मोरे, तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. समीर पटवर्धन व अ‍ॅड. आनंद देशपांडे (सांगली) हे दोघे जण न्यायालयात उपस्थित होते. दुपारी समीर गायकवाडचा जामीन अर्ज बिले यांनी फेटाळला. त्यानंतर अ‍ॅड. पटवर्धन यांनी कोणत्या मुद्द्यांच्या आधारे जामीन अर्ज फेटाळला, असा विनंती अर्ज न्यायालयात सादर केला. याबाबत अ‍ॅड. समीर पटवर्धन यांना विचारले असता ते म्हणाले, ‘न्यायालयाने समीर गायकवाडविरोधातील आरोपपत्र निश्चित करावे. या खटल्याचे कामकाज जलद गतीने सुरू व्हावे, अशी आमची मागणी आहे. यानंतर अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी, पानसरे हत्येतील विविध मुद्द्यांचा आधार घेत, न्यायालयाने समीर गायकवाडचा जामीन अर्ज फेटाळला,’ असे पत्रकारांना सांगितले.(प्रतिनिधी)राज्य शासनाकडे आम्ही गोविंद पानसरे हत्येसंदर्भात अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार, शासनाने अ‍ॅड. निंबाळकर यांची या खटल्यासाठी नियुक्ती केली. समीर गायकवाडचा जामीन अर्ज फेटाळल्याबद्दल आम्ही समाधानी आहोत.- मेघा पानसरे, गोविंद पानसरे यांच्या स्नुषासमीर गायकवाडचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने नामंजूर केला आहे. त्यामुळे समीर गायकवाडवर न्यायालयाने आरोप निश्चित करावेत, त्यासाठी हा खटला जलद गतीने व त्वरित सुरू करावा.- अ‍ॅड. समीर पटवर्धन, आरोपी समीर गायकवाडचे वकील