शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

खटला वर्ग करण्याचा समीरचा अर्ज मागे

By admin | Updated: February 19, 2016 03:38 IST

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी समीर गायकवाडने खटला कोल्हापूर सत्र न्यायालयातून अन्य ठिकाणी वर्ग करण्यात यावा, यासाठी उच्च न्यायालयात केलेला अर्ज गुरुवारी मागे घेतला

मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी समीर गायकवाडने खटला कोल्हापूर सत्र न्यायालयातून अन्य ठिकाणी वर्ग करण्यात यावा, यासाठी उच्च न्यायालयात केलेला अर्ज गुरुवारी मागे घेतला. उच्च न्यायालयानेही अर्ज मागे घेण्यास परवानगी दिली.समीर गायकवाडने कोल्हापूरच्या सत्र न्यायालय आणि कोल्हापूर बार असोसिएशनविरुद्ध तक्रार करत ही केस कोल्हापूर न्यायालयातून अन्य न्यायालयात वर्ग करण्यात यावी, अशी विनंती अर्जाद्वारे उच्च न्यायालयाला केली होती.कोल्हापूरमध्ये आपल्याला न्याय मिळणार नाही. तेथील बार असोसिएशन खटला लढवण्यासाठी एकही वकील देण्यास तयार नाही. तसा ठरावच त्यांनी केल्याचे गायकवाड याने अर्जात म्हटले होते. तसेच सुनावणीवेळी वकीलच न्यायालयात गोंधळ घालतात आणि कोल्हापूरमध्ये आपल्याविरुद्ध निदर्शने करण्यात येतात. त्यामुळे कोल्हापूरमध्ये न्याय मिळणार नाही. त्यामुळे हा खटला अन्य ठिकाणी वर्ग करण्यात यावी, अशी मागणी गायकवाडने अर्जाद्वारे केली होती.गेल्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला या अर्जावर उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. त्यावर पोलिसांनी उत्तर देत कोल्हापूर बार असोसिएशनचे पत्रही उच्च न्यायालयापुढे सादर करण्यात आले.या पत्रात कोल्हापूर बार असोसिएशनने गायकवाडला वकील न देण्यासंदर्भात कोणाताही ठराव मंजूर केला नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्याला हव्या असलेल्या वकिलाला तो त्याचा खटला लढवण्यासाठी नियुक्त करू शकतो, असेही म्हटले.बार असोसिएशनच्या वकील न देण्याच्या भूमिकेमुळे गायकवाडने खटला वर्ग करण्यासाठी अर्ज केला होता. मात्र बार असोसिएशनने त्यांची भूमिका स्पष्ट करत समीरला वकील देण्याची तयारी दर्शवल्याने हा अर्ज मागे घेत आहोत, असे गायकवाडच्या वकिलांनी न्या. आर. पी. सोंदुरबलदोटा यांना सांगितले. त्यावर न्या. सोंदुरबलदोटा यांनी हा अर्ज मागे घेण्याची परवानगी गायकवाडला दिली. (प्रतिनिधी) पुंगळ्या, गोळी सीबीआयच्या ताब्यातकोल्हापूर : ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील घटनास्थळावरून जप्त केलेल्या पाच पुंगळ्या तसेच डॉक्टरांनी पानसरे यांच्या शरीरामधून काढलेली एक गोळी गुरुवारी नवी मुंबई येथील केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाच्या पथकाला देण्यात आली. या पुंगळ्या व गोळी नवी दिल्लीतील सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज (सीएफएसएल) येथे तपासण्यात येणार आहेत.