शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

समीरवरची आरोप निश्चिती ४ मेला

By admin | Updated: April 30, 2016 04:55 IST

आरोपी समीर गायकवाड याच्या विरोधात दोषारोपपत्र निश्चित करण्याचे सर्वाधिकार सत्र न्यायालयास आहेत, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या विरोधात दोषारोपपत्र निश्चित करण्याचे सर्वाधिकार सत्र न्यायालयास आहेत, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशाची प्रत पाहून ४ मे रोजीच्या सुनावणीमध्ये दोषारोप केव्हा निश्चित करायचे यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, तोपर्यंत सुनावणी तहकूब ठेवण्याचा निर्णय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल.डी. बिले यांनी शुक्रवारी घेतला. संशयित गायकवाडला कारागृहातून सशस्त्र पोलीस बंदोबस्तात न्यायालयात आणले होते. पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर व डॉ. एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार सीबीआय, एसआयटी व सीआयडी (कर्नाटक) यांच्यात समन्वयाने सुरू आहे. न्यायालयाने या तपास यंत्रणेला ३ मेपर्यंत पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. समीर गायकवाड याच्या जामीन अर्जावर ६ मे रोजी सुनावणी आहे. त्यामुळे या दोन्ही सुनावणीनंतर ११ मे रोजी दोषारोप निश्चित करण्यासाठी सुनावणी ठेवावी, अशी विनंती विशेष सरकारी वकील हर्षल निंबाळकर यांनी केली. त्यावर समीरचे वकील समीर पटवर्धन यांनी आपली कोणतीच हरकत नसल्याचे सांगितले. (प्रतिनिधी) फिरण्यास बंदी घातल्याची समीरची तक्रारसमीर गायकवाड हा कळंबा मध्यवर्ती कारागृहात अंडा सेलमध्ये बंदिस्त आहे. त्याला सत्र न्यायालयाने दुपारी १२ ते ३ या वेळेत अंडा सेलच्या बाहेर फिरण्यास मुभा दिली होती; परंतु कारागृह प्रशासनाने २५ एप्रिलपासून त्याला बाहेर सोडण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे मी कोणाशी बोलू शकत नसल्याने वेडा होईन, मला पहिल्यासारखी मोकळीक द्यावी, अशी विनंती समीरने न्यायाधीश बिले यांच्याकडे केली. त्यांनी यासंदर्भात कारागृह प्रशासनाला सूचना केल्या जातील, असे सांगितले.