शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

समीर, पंकज भुजबळ यांचे पासपोर्ट जप्त

By admin | Updated: February 7, 2016 04:16 IST

बेहिशेबी मालमत्ता आणि महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी छगन भुजबळ अडचणीत असतानाच मनी लाँड्रिंगप्रकरणी अटकेत असलेले त्यांचे पुतणे समीर यांचा पासपोर्ट सक्तवसुली संचालनालयाने

- डिप्पी वांकाणी, मुंबई

बेहिशेबी मालमत्ता आणि महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी छगन भुजबळ अडचणीत असतानाच मनी लाँड्रिंगप्रकरणी अटकेत असलेले त्यांचे पुतणे समीर यांचा पासपोर्ट सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ताब्यात घेतला आहे. शिवाय त्यांचा मुलगा आणि आमदार पंकज भुजबळ यांचाही पासपोर्ट आज ईडीने हस्तगत केला. छगन भुजबळ लवकरच अमेरिकेतून मुंबईत परतणार असून, ते विमानतळावर आल्यानंतर त्यांचाही पासपोर्ट ताब्यात घेण्यात येईल, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.समीर भुजबळ यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या बांधकाम व्यवसायातील भागीदारांवर मुंबईत ईडीने छापे घातले. आतापर्यंतच्या चौकशीत या भागीदारांची नावे आली नव्हती. समीर यांच्या अटकेमुळेच ती समोर आली, असे कळते. समीर यांची अटक, पंकज यांचा पासपोर्ट ताब्यात घेणे आणि छगन भुजबळ यांच्या परतण्याची वाट पाहणे या साऱ्यांमुळे सर्व भुजबळ कुटुंबीय अतिशय अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ईडीला भुजबळांची प्रतीक्षाछगन भुजबळ मुंबईत कधी पोहोचतात, याची ईडीचे अधिकारी वाट पाहत आहेत. त्यांचा पासपोर्ट ताब्यात घेण्याची प्रक्रिया ईडीला लगेचच करायची आहे. मात्र भुजबळ यांचे समर्थक विमानतळावर शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या ठिकाणी कोणताही गोंधळ होऊ नये, याचीही काळजी घेण्यात येत आहे. ...म्हणून जप्तीची कारवाईसमीर यांना गेल्या आठवड्यात चौकशीस ईडीने बोलावले, त्याचवेळी छगन भुजबळ यांचीही चौकशी केली जाणार होती. मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ते अमेरिकेला निघून गेले होते. त्याची ईडीला अजिबातच माहिती नव्हती. आता चौकशीचे पाश आवळले जात असताना भुजबळ कुटुंबीयांनी परदेशात निघून जाण्याचा प्रयत्न करू नये, यासाठी ही काळजी घेण्यात येत असल्याचे कळते. ललित मोदी ज्या पद्धतीने भारतातून निघून गेले व त्यांना आजही भारतात आणणे अवघड होऊन बसले आहे, तसे भुजबळ कुटुंबीयांच्या बाबतीत होता कामा नये, असा आमचा प्रयत्न असल्याचे तपास यंत्रणेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.