शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

समीर गायकवाडच्या कोठडीत वाढ

By admin | Updated: November 8, 2015 00:25 IST

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड (३२) याच्या न्यायालयीन कोठडीत आणखी १५ दिवसांची

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड (३२) याच्या न्यायालयीन कोठडीत आणखी १५ दिवसांची वाढ करण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुनीलजित पाटील यांनी हे आदेश शनिवारी दिले. ही सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार होती, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे न्यायालय व कारागृह प्रशासनाचा संवाद होऊ न शकल्याने न्यायालयातच समीरच्या गैरहजेरीत सुनावणी झाली. समीर सध्या कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. शुक्रवारी समीरच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्याची दाट शक्यता होती. पुरेसा पोलीस फौजफाटा उपलब्ध नसल्याने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्याचा निर्णय झाला. साडेचारच्या सुमारास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुनीलजित पाटील यांच्यासमोर सुनावणीला सुरुवात झाली, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे दोन्ही बाजूंचा संवाद होऊ शकला नाही. पोलीस निरीक्षक देशमुख यांनी संशयित आरोपीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करावी, अशी विनंती यावेळी केली. त्यावर न्या. पाटील यांनी समीरच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करीत असल्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी) समीरला काही सांगायचे आहे समीर गायकवाड याची कळंबा कारागृहात त्याचे वकील अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी शनिवारी सकाळी भेट घेतली. यावेळी समीरने तीन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्याला न्यायालयाला पत्र द्यायचे आहे किंवा न्यायालयात स्वत: हजर राहून सांगायचे आहे. त्यामुळे त्याला आजच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर करावे, असा अर्ज अ‍ॅड. इचलकरंजीकर यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांना दिला. त्यावर न्या. डांगे यांनी १७ नोव्हेंबर ही सुनावणीची तारीख देत, सरकारी वकिलांनी म्हणणे सादर करावे. त्यानंतर या अर्जावर निकाल दिला जाईल, असे सांगितले.