कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित ‘सनातन’ संस्थेचा साधक समीर विष्णू गायकवाडला सोमवारी येथील प्रथम वर्ग न्यायाधीश आर. डी. डांगे यांनी ९ आॅक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानुसार पोलिसांनी त्याची कळंबा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. समीरची पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. फिर्यादीचे खासगी वकील विवेक घाटगे यांनी युक्तिवाद मांडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीच्या वकिलाने त्यास कडाडून विरोध केला. त्यामुळे काही वेळ न्यायालयात गोंधळ उडाला. मडगाव बॉम्बस्फोटातील फरार संशयित आरोपी रुद्र पाटील हा पानसरे हत्येत ‘मास्टर मार्इंड’ असल्याचे सांगितले जात आहे; परंतु बारा दिवसांच्या तपासामध्ये रुद्रबाबत कसलाही पुरावा पोलिसांकडे नाही, असे आरोपीचे वकील समीर पटवर्धन यांनी सांगितले. त्यास सरकारी वकील किंवा तपास अधिकाऱ्यांनी कोणतेही प्रत्युत्तर दिले नाही. (प्रतिनिधी)
समीर गायकवाडला ९ आॅक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
By admin | Updated: September 29, 2015 02:51 IST