शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

संभाजी ब्रिगेड उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 06:04 IST

लोकसभेच्या ३०, तर विधानसभेच्या १०० जागा लढविणार

मुंबई : औरंगाबादमध्ये ९ डिसेंबरला स्वराज्य संकल्प मेळाव्याची हाक देत, संभाजी ब्रिगेडने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा शुक्रवारी केली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ब्रिगेडचे महाराष्ट्र संघटक कपिल डोके यांनी ही माहिती दिली.

डोके म्हणाले की, सत्ताधारी किंवा विरोधकांना शेतकरी आत्महत्या दिसत नाहीत. मेलेल्या वाघिणीच्या विषयावर राजकारण होते. मात्र, स्वत:चे सरण रचून आत्महत्या करणाऱ्या शेतकºयांवर चर्चा करण्यासाठी प्रस्थापित पक्षांकडे वेळ नाही. तरुणांच्या रोजगाराऐवजी शहरांची नावे बदलण्यात सरकार व्यस्त आहे. म्हणूनच पुरोगामी महाराष्ट्रात जनतेसाठी संभाजी ब्रिगेड हा सक्षम पर्याय असल्याचा दावा ढोके यांनी केला आहे.

लोकसभेच्या ३० जागा आणि विधानसभेच्या १०० जागा लढणार असल्याचे संभाजी ब्रिगेडने स्पष्ट केले, तसेच आगामी निवडणुकीचे बिगुल वाजवण्ययासाठी ९ डिसेंबरला स्वराज्य संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात निवडणुकीचा अजेंडा व पुढील वाटचालीबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे, ब्रिगेडचे मुंबई प्रदेश अध्यक्ष दिनेश महाडिक यांनी स्पष्ट केले.

महाडिक म्हणाले की, बºयाच मतदार संघात आमची स्वबळावर लढण्याची तयारी आहे. सोबतच समविचारी पक्षांशिवाय कोणत्याही प्रस्थापित पक्षासोबत जाणार नसल्याचेही त्यांनी याबाबत अधिक माहिती देताना स्पष्ट केले.‘दंगली पेटवू नका!’निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिराचा मुद्दा उकरून काढत, शिवसेनेकडून हिंदू-मुस्लीम धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका ब्रिगेडने केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना धनगर आणि मुस्लीम आरक्षण प्रलंबित ठेवत सरकार जातींमध्ये भांडणे लावण्याचे काम करत आहे. अशाप्रकारे देशात दंगली पेटवून भावनिक मुद्द्यांवर मते लाटण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहनही ब्रिगेडने केले आहे.

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९