शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी ब्रिगेड उतरणार राजकारणात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2016 03:11 IST

३0 नोव्हेंबरला मुंबईत घोषणा; येणा-या सर्व निवडणुका लढणार!

राजरत्न सिरसाटअकोला, दि. १७- जेम्स लेन यांनी लिहिलेल्या शिवचरित्रावरील पुस्तकाला विरोध करू न राज्यात चर्चेत आलेल्या संभाजी ब्रिगेडने राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे, राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर येत्या ३0 नोव्हेंबर रोजी मुंबईत याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार असून, या घोषणेनंतर राज्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसह सर्वच निवडणुकीत संभाजी ब्रिगेड स्वबळावर उमेदवार उभे करणार आहे.संभाजी ब्रिगेडच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. मागील २५ वर्षांचा संघटनेचा लेखाजोखा बघितल्यानंतर संघटनेने सामाजिकदृष्ट्या केलेले काम उल्लेखनीय आहे. बहुजन समाजाला जोडण्यासाठी अनेक वैचारिक कार्यक्रम राबविले; असे असले तरी, विकासाच्या कुलुपाची चावी राजकारण आहे. राजकारणाच्या माध्यमातूनच सामाजिक, राजकीय तसेच विकासाचे प्रश्न सोडवता येतात, म्हणूनच शंभर टक्के समाजकारणासह शंभर टक्के राजकारण करण्यासाठीच राजकीय पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय संभाजी ब्रिगेडने घेतला आहे. राजकीय पक्ष स्थापन्यापूर्वी संभाजी ब्रिगेडने पक्षाचे विविध सेल सुरू करण्याचे नियोजन केले असून, १६ नोव्हेंबर रोजी मुंबईत झालेल्या पक्षाच्या राज्यस्तरीय बैठकीत महाराष्ट्र वैद्यक परिषद सेल निर्माण केला आहे. पक्षासोबत समविचारी संघटना जोडल्या जाणार आहेत. त्यासाठीचे प्रस्ताव पक्षाक डे प्राप्त झाले आहेत. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे व महासचिव सौरभ खेडेकर, प्रदेश उपाध्यक्ष सुभाष बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.राजकीय पक्ष म्हणून शेतकरी, ग्रामीण जनतेचे प्रश्न प्रामुख्याने पक्ष हातात घेणार असून, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्यात यावा, प्रत्येक गाव दारू मुक्त करणे आदींसाठीचा लढा पक्ष सुरुवातीला उभारणार आहे. पक्ष मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक उभारणार असून, माध्यमांच्याही क्षेत्रात पाऊल टाकणार आहे. - संभाजी ब्रिगेडने मागील २५ वर्षे सामाजिक संघटना म्हणून काम केले आहे. आता राजकीय पक्षात संघटनेला परावर्तीत करण्यात येत आहे. ३0 नोव्हेंबर रोजी मुंबई वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पक्षाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. त्यासाठी पक्षाने रितसर राजकीय पक्षाची मान्यता मिळवली आहे.- पंकज जायले,जिल्हाध्यक्ष,संभाजी ब्रिगेड,अकोला.-शेतमालाला हमी भाव, दारुमुक्त गाव हे पक्षाचे घोषवाक्य असून, ३0 नोव्हेंबरला मुंबईत पक्ष स्थापना केली जाणार आहे. सुभाष बोरकर, प्रदेश उपाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, वाशिम.