शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

साळवाडीचा नादुरुस्त पूल अखेर कोसळला

By admin | Updated: September 21, 2016 01:34 IST

बोरी बुद्रुक व साळवाडी गावांना जोडणारा पूल निकृष्ट कामामुळे मंगळवारी कोसळला.

राजुरी : बोरी बुद्रुक व साळवाडी गावांना जोडणारा पूल निकृष्ट कामामुळे मंगळवारी कोसळला. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही. या भागातील जवळपास १० गावांना जोडणाऱ्या कुकडी नदीवरील या पुलाचे काम जवळपास २५ वर्षांपूर्वी झालेले होते. ठकेदाराने निकृष्ट काम केले होते. नदीला पूर आल्याने काही दिवसांतच पाया खचल्याने पूल धोकादायक झाला होता. सातत्याने खचणाऱ्या पुलाचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. मात्र, पाटबंधारे खाते आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या दुरुस्तीबाबत कुठलीच हालचाल न केल्याने हा पूल कोसळला.आॅगस्ट महिन्याच्या १० तारखेला हा पूल पहाटे खचून पुलाला मोठी भेग पडली होती. तेव्हपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हा खचलेल्या पुलाचे दोन तुकडे होऊन स्लॅब कोसळला. दुरवस्थेमुळे भविष्यात पुलाला धोका असल्यामुळे दुरुस्तीबाबत लोकमतने दोन वर्षांपासून वारंवार वृत्त प्रसिद्ध केले होते. फेब्रुवारीच्या १५ तारखेलाही पूल कोसळण्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. यामुळे या पुलावरील वाहतूक बंद करून पुलाची दुरुस्ती करण्याच्या मागणीचे पत्र दोन्ही गावांतील सरपंच पुष्पा कोरडे तसेच कैलास काळे व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भोर व सुनील जाधव यांनी केली होती. मात्र, याची दखल न घेतल्याने हा पूल सोसळला.>पूल कोसळल्यामुळे नागरिकांना सुमारे २५ किलोमीटर अंतर कापून यावे लागत आहे. पुलाच्या कामासाठी एक कोटी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असूनही काम आता तरी त्वरित सुरू करण्यात यावे; अन्यथा उपोषण करण्यात इशारा सामाजिक कार्यकर्ते राजेद्र भोर व सुनील जाधव यांनी दिला आहे.पुलाची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आले होते. त्यांनी पाहणी करून पुलाच्या दुरुस्तीबाबत आश्वासन दिले होते. दुरुस्तीसाठी येथील वाहतूकही बंद करण्यात आली होती. मात्र, दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले नव्हते. पाहणीनंतर तब्बल ४० दिवसांनी ही घटना घडली. हा पूल तेव्हापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे दोन्ही गावांच्या बाजूला असणाऱ्या दहा ते बारा गावांना याचा फटका बसला असून पूर्णपणे संपर्क तुटलेला आहे.