ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - हिट अँड रन प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या सलमान खानच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून त्याला पुन्हा जामीन मिळेल की तुरूंगात जावे लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान सलमानच्या एका चाहत्याने हायकोर्टाबाहेर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी त्या तरूणाला तत्काळ रुग्णालयात दाखल केले आहे.
अपघातावेळी उपस्थित कमाल खानची साक्ष अद्याप बाकी - सलमानचे वकील
ज्यावेळी अपघात घडला त्यावेळी गाडीत चारजण उपस्थित होते, त्यापैकी कमाल खानची साक्ष अद्याप नोंदवण्यात आली नव्हती असे सांगत बचावपक्षाने रविंद्र पाटीलच्या जबाबाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.