शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
6
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
7
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
10
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
11
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
12
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
13
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
14
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
15
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
16
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
17
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
18
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
19
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
20
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका

सलमानच्या चाहत्यांनी घेतला न्यायालयाचा ताबा

By admin | Updated: May 7, 2015 04:37 IST

सलमानच्या हिट अ‍ॅन्ड रन प्रकरणी बुधवारी निकाल लागणार हे कळताच चाहत्यांनी तोबा गर्दी करत सत्र न्यायालयाचा आवार ताब्यात घेतला.

मुंबई : सलमानच्या हिट अ‍ॅन्ड रन प्रकरणी बुधवारी निकाल लागणार हे कळताच चाहत्यांनी तोबा गर्दी करत सत्र न्यायालयाचा आवार ताब्यात घेतला. या गर्दीत भाईचे काय होणार या काळजीने मुंबई, राज्याबाहेरून आलेल्या चाहत्यांचाही समावेश होता. तर सलमानच्या डमीने उपस्थित गर्दीचे लक्ष वेधून घेतले होते. ‘चुका माणसांकडूनच होतात’, ‘सलमानने केलेले सामाजिक कार्य पाहून त्याला माफ करावे’, अशा वेगवेगळ््या प्रतिक्रिया चाहत्या वर्गामधून उमटत होत्या. तर दुसरीकडे सलमानला न्यायालयाने कठोर शिक्षा द्यावी या मागणीसाठी काही तमीळ तरूण न्यायालयाबाहेर गोळा झाले होते. सुनावणी सुरू झाल्यानंतर काही वेळातच सलमानला दोषी ठरवल्याची बातमी न्यायालयाच्या आवारात आगीप्रमाणे पसरली. तितक्यात सलमानचा धाकटा भाऊ आणि अभिनेता सोहेल न्यायालयाबाहेर पडला. मागोमाग आमदार बाबा सिद्धीकीही खाली उतरले. सोहेलचा चेहरा पूर्णपणे पडलेला होता. त्याचे भरून आलेले डोळे सर्र्वकाही सांगून जात होते. सोहेलला पाहून प्रतिक्रियेसाठी प्रसारमाध्यमांनी एकच कल्लोळ केला. मात्र सोहेलने प्रतिक्रिया देणे टाळले. एक शब्दही न बोलता तो मुख्य रस्त्यालगत आला. तेथेही माध्यम प्रतिनिधींनी त्याला घेरले. अश्रुंचा बांध फुटण्याआधी आलेल्या टॅक्सीत बसून सोहेलने तेथून काढता पाय घेतला. गेटबाहेर असलेल्या पोलिसांच्या गाडीतून सलमानला घेऊन जाणार, अशी कंडी मध्येच पिकली. त्यामुळे चाहत्यांनी आपला मोर्चा पोलीस व्हॅनकडे वळवला. न्यायालयाने सलमानला दोषी ठरविल्यानंतर ब्रेक घेतला. ब्रेकनंतर त्याची शिक्षा जाहीर होणार होती. ही माहिती मिळताच चाहत्यांची गर्दी पांगेल, असे वाटत होते. प्रत्यक्षात मात्र गर्दी तेथेच खिळून राहिली. सलमानला पाहाण्याची गर्दीला जास्त उत्सुकता दिसत होती. रखरखत्या उन्हातही चाहते गेटसमोरून हटायला तयार नव्हते. अखेर एक वाजण्याच्या सुमारास चाहत्यांना आवरणे पोलिसांना कठीण होऊ लागले. अखेर पोलिसांनी चाहत्यांवर सौम्य लाठीमार केला. पांगापांग पांगल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी निकालाच्या प्रतिक्षेत गेटबाहेर गर्दी केली. जेमतेम २० मिनिटांनंतर दीड वाजण्याच्या सुमारास चाहत्या वर्गाने पुन्हा एकदा गेटचा ताबा घेतला.पावणे दोन वाजण्याच्या सुमारास सलमानला गेट क्रमांक तीनमधून बाहेर नेणार असल्याची वार्ता कोर्ट परिसरात पसरली. दोनच मिनिटांत गेटबाहेरील पोलिसांची गाडीही गेट क्रमांक तीनच्या दिशेने रवाना झाली. तसा जमलेला चाहता वर्गही पोलिसांच्या गाडीपाठोपाठ गेट क्रमांक तीनच्या समोर धावून गेला. अवघ्या काही मिनिटांत मुख्य प्रवेशद्वाराबाहेरील शेकडो चाहत्यांनी गेट क्रमांक तीनचा ताबा घेतला होता.

----------भाई का डुप्लिकेट! : ‘भाई का फैसला हैं!’, म्हणत त्याच्या नकला करणारा शान घोष निकालासाठी नागपूरहून मुंबईला आला होता. सलमानच्या बीइंग ह्युमन या संस्थेला मदत करण्याचे कामही शान करतो. शिवाय सलमानच्या नकलाही करतो. एक कार्यक्रम सोडून केवळ काय निकाल लागणार हे पाहण्यासाठी मुंबईला आल्याचे शानने सांगितले. सलमानप्रमाणे गेटअप केलेल्या शानला एका बाजून पाहिल्यास खुद्द सलमानच प्रतिक्रिया देतोय की काय, असा भास बघ्यांना होत होता. त्यामुळे शानभोवतीही चाहत्यांनी गराडा घातला होता.-----------यापुढे भरधाव गाडी चालवणारे धसका घेतील - प्रदीप घरतमुंबई : अभिनेता सलमान खान हा सेलिब्रेटी आहे. त्याचा फॅन क्लब मोठा आहे. त्याचे अनुकरण करणारे लाखोजण आहेत. सलमानने भरधाव गाडी चालवून एकाचा बळी घेतला आहे. याचे सबळ पुरावे सादर झाले असून त्याआधारावर न्यायालयाने सलमानला यासाठी दोषी धरले आहे. त्यामुळे त्याला कठोर शिक्षा झाल्यास भरधाव गाडी चालवणारे धसका घेतील, असा विश्वास विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी व्यक्त केले.हिट अ‍ॅण्ड रन खटल्यात घरत यांनी सरकारतर्फे बाजू मांडली. सलमान सामाजिक संस्थांना मदत करतो व त्याला शिक्षा झाल्यास जनसेवा थांबेल हा बचाव पक्षाचा दावा अत्यंत चुकीचा आहे. सलमानने गुन्हा केला आहे. कायद्यासमोर सर्व समान आहे. त्याने किती मदत केली हा मुद्दा त्याच्या गुन्ह्यासमोर गौण आहे. सलमानने केलेल्या कोट्यवधी रूपयांच्या मदतीचा विचार शिक्षा ठोठावताना करणे अयोग्य आहे.सध्या भरधाव गाडी चालवणाऱ्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. भरधाव गाडी चालवायची असल्यास एक्सप्रेस वे वर जा,असे आपण सहज बोलून जातो.याचा अर्थ भरधाव गाडी चालवणे नित्याचे झाले आहे. हे कोठे तरी थांबायला हवे. सलमानसारख्या अभिनेत्याला शिक्षा झाल्यास याचे प्रमाण कमी होईल. महत्त्वाचे म्हणजे हे सुनावणी न्यायालय आहे. सलमानला शिक्षा पाच वर्षांची असल्याने त्याने उच्च न्यायालयात जामीनसाठी अर्ज केला आहे. आता यावरील सुनावणी शुक्रवारी असली तरी यापूर्वी तो जामीनवर राहीला आहे. परिणामी उच्च न्यायालायातील सुनावणीदरम्यान जामीन मिळण्यात अडचण येईल, असे वाटत नाही, असे अ‍ॅड. राजेंद्र शिरोडकर यांनी सांगितले.सलमानला अंतरिम जामीन मिळाल्यानंतर आता शुक्रवारी उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी होणार आहे. अशा प्रकरणात अपीलिट पॉवरमध्ये उच्च न्यायालय जामीन देवू शकते. विशेषत: एखाद्याला दीर्घकाळ जामीन मिळाला असेल किंवा एखादा व्यक्ती मोठया जामिनावर बाहेर असेल. आणि या जामीनावर असताना त्याने गुन्हा केला नाही, संबधित व्यक्ती व्यवस्थित वागला, त्याने नियमांचा भंग केला नाही तर संबधित व्यक्तीला जामीन मिळण्यात काहीच अडचणी येत नाहीत, असे ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. एन.एन. गवाणकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)