शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सलमानच्या ‘बॉडीगार्ड’ने तरुणाला बेदम चोपले

By admin | Updated: October 27, 2016 04:48 IST

वादग्रस्त वक्तव्यामुळे टीकेचे लक्ष्य ठरणारा अभिनेता सलमान खान, आता पुन्हा खासगी सुरक्षारक्षकाच्या कृत्यामुळे चर्चेत आला आहे. या सुरक्षारक्षकाने मंगळवारी मध्यरात्री

मुंबई : वादग्रस्त वक्तव्यामुळे टीकेचे लक्ष्य ठरणारा अभिनेता सलमान खान, आता पुन्हा खासगी सुरक्षारक्षकाच्या कृत्यामुळे चर्चेत आला आहे. या सुरक्षारक्षकाने मंगळवारी मध्यरात्री विलेपार्ले येथे परिचयातील एका तरुणाला रिव्हॉल्वरचा धाक दाखवत बेदम मारहाण केली. या प्रकरणी डी.एन.नगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अख्तर कुरेशी (२५) हा दोन मित्रांसोबत आॅडी कारमधून जात असताना विलेपार्ले येथे सलमानचा खासगी सुरक्षारक्षक गुरमितसिंह शेरा याला रस्त्यात पाहिले. तेव्हा कुरेशी एका परिचित व्यक्तीशी मोबाइलवर बोलत होता. ओळख असल्याने शेराला पाहताच, कुरेशीने गाडी थांबविली आणि तो फोन शेराकडे दिला. फोनवर बोलताना शेराचा समोरच्या व्यक्तीशी वाद झाला आणि चिडून त्याने फोन कट केला. त्यानंतर, त्याने कुरेशीला शिवीगाळ करीत मारहाण केली. त्याचा कारचालक व अन्य दोन बॉडीगार्डनीही अख्तरला मारहाण केली. आपल्याकडील रिव्हॉल्वर दाखवून धमकी देत, तेथून ते निघून गेले. याबाबत अख्तरने डी. एन. नगर पोलीस ठाण्यात शेरा व त्याच्या साथीदारांविरुद्ध तक्रार दिली. तथापि, शेरा याने मात्र, या घटनेचा इन्कार केला असून, आपण घटनास्थळी हजर नसल्याचा दावा केला आहे. (प्रतिनिधी)शेरा गेल्या १८ वर्षांपासून सलमान खानचा बॉडीगार्ड म्हणून काम करीत आहे. शेराचा मुलगा टायगर यालाही सलमानने चित्रपटात ब्रेक दिला होता. शेराला स्वत:ची सिक्युरिटी एजन्सीही उघडून दिली. त्याच्याकडून विविध सिलेब्रिटींना सुरक्षा पुरविण्याचे काम दिले जाते. सलमानच्या करिअरमधील सर्व चढउतारांचा तो जवळचा साक्षीदार आहे.परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, मोबाइलचे कॉल डिटेल्स रेकॉर्डची पडताळणी केली जात आहे. याबाबत सत्यता पडताळून कारवाई केली जाईल.- धनाजी नलावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डी. एन. नगर पोलीस ठाणे