शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

सलमान लवकरच घेणार इमानची भेट

By admin | Updated: February 16, 2017 05:14 IST

बेरिएट्रिक सर्जरी अर्थात वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेसाठी इजिप्तहून मुंबईत दाखल झालेली ३६ वर्षीय इमान अहमद ही बॉलीवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान याची चाहती

मुंबई : बेरिएट्रिक सर्जरी अर्थात वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेसाठी इजिप्तहून मुंबईत दाखल झालेली ३६ वर्षीय इमान अहमद ही बॉलीवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान याची चाहती आहे. इमानची शस्त्रक्रिया करणारे डॉ. मुफ्फजल लकडावाला हे खान कुटुंबीयांचेही डॉक्टर असल्याने तिची ही इच्छा लवकरच पूर्ण होण्याची शक्यता असून सलमान लवकरच इमानची भेट घेईल.बेरिएट्रिक सर्जरी होण्यापूर्वी चर्नी रोड येथील सैफी रुग्णालयात उपचार घेत असलेली इमान सलमानच्या किक, दबंग, सुलतान यासारख्या चित्रपटांतील गाणी टीव्हीवर पाहत आहे. चाहत्यांच्या भेटीगाठीच्या इच्छा सलमान सहसा टाळत नाही. कुठलीही अधिकृत विचारणा झाली, तर आम्ही त्याबाबत विचार करू, असे सलमानचे पिता सलीम खान यांनी सांगितले आहे. सलमान अशाप्रकारे अनेक रुग्णांची भेट घेतो, त्यामुळे विनंती नाकारण्याचा प्रश्नच नसल्याचेही सलीम खान यांनी सांगितले. तर खान कुटुंबीयांचे डॉक्टर असणारे मुफ्फजल लकडावाला यांनी याविषयी सांगितले की, लवकरच रुग्णालय प्रशासनाच्या परवानगीनंतर सलमान खानला अधिकृतरीत्या इमानच्या भेटीबद्दल विचारले जाईल, त्याने होकार कळविल्यास ही भेट निश्चितच होईल.इजिप्तमधल्या अलेक्झॅन्ड्रियामधील इमान अहमद अब्लदुलाती या ५०० किलो वजन असलेल्या ३६ वर्षीय महिलेवर प्रख्यात बेरिएट्रीक सर्जन डॉ. मुफ्फझल लकडावाला मोफत शस्त्रक्रिया करणार आहेत. शस्त्रक्रियेनंतर जवळपास सहा महिने इमानला भारतात डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहावे लागणार आहे. सैफी रुग्णालयात इमानसाठी उभारण्यात आलेल्या ‘वन बेड हॉस्पिटल’साठी तब्बल दोन कोटी रुपयांचा खर्च आला आहे. या विशेष रुग्णालयाचा दरवाजा सात फुटांचा आहे, शिवाय बेडसुद्धा इमानच्या वजनाच्या अनुसार उपलब्ध करून दिला आहे. तसेच या हॉस्पिटलमध्ये एक आॅपरेशन थिएटर, एक अतिदक्षता विभाग, डॉक्टरांसाठी एक रूम, दोन विश्रामगृहे, देखभाल करणाऱ्या डॉक्टरांचा कक्ष आणि एक व्हिडीओ कॉन्फरन्स्ािंग रूम अशी रचना आहे. (प्रतिनिधी)