मुंबई : उच्च न्यायालयाने सलमान खानला दोषमुक्त जाहीर केल्यानंतर दिवसभर सोशल मीडीयावर नाराजीचा सूर व्यक्त होताना दिसला. तर सलमानच्या काही चाहत्यांनी या निर्णयाचे स्वागतही केले. मात्र फेसबुक, टष्ट्वीटर आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून नेटिझन्सने या प्रकरणाचा खरपूस समाचार घेत थेट ‘कारच दारु प्यायलेली होती..’ अशा शब्दांत कोपरखळी व्यक्त केली.निर्णयानंतर सोशल मीडीयावर ‘सलमान व्हर्डीक्ट’हा हॅशटॅग दिवसभर दिसून आला. तर या सर्व प्रकरणावर एका चाहत्याने ‘प्रेम रतन घर जायो’ असा नवा चित्रपट येणार असल्याचे सांगत चित्रपटाचा पोस्टर तयार करून पोस्ट केला आहे. तर एका काही नेटिझन्सने व्हॉट्सअपवरील स्टेट्स आणि डीपी बदलूनही या निर्णयावरील रोष व्यक्त केला. तर एका नेटिझन्सने ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ प्रमाणेच आता ‘नो जेल डिसेंबर’ महिना सेलिब्रेट करणार असल्याचे म्हटले आहे.काही नेटिझन्सने या प्रकरणी संताप व्यक्त करीत सलमान नाही, त्याचा चालक नाही तर पहिल्यांदाच कारच दारु प्यायली होती का? असा उपरोधिक सवालही उपस्थित केला आहे. मात्र नाराजीप्रमाणे सोशल मीडीयावर सलमानचे अभिनंदन करणाऱ्या चाहत्यांची रीघही दिसून आली. दिवसभरात सर्वात जास्त वेळा सोशल मीडीयावर सलमान विषयी सर्चिंग झाल्याचे दिसून आले.
सलमानची कारच दारु प्यायलेली होती !!!
By admin | Updated: December 11, 2015 02:01 IST