मुंबई : हिट अॅण्ड रनची घटना घडली तेव्हा अभिनेता सलमान खान दारू प्यायला होता व याचे पुरावे न्यायालयात सादर झाल्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी बुधवारी सत्र न्यायालयात केला.ते म्हणाले, की ही घटना घडल्यानंतर सलमानच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यातून त्याच्या रक्तात मद्य होते, हे स्पष्ट झाले आहे. सलमानच्या रक्ताचे नमुने घेताना आणि ते तपासताना कोणताही गैरप्रकार झालेला नाही.तसेच गाडीचा टायर फुटल्याने ही घटना घडल्याचा बचाव पक्षाचा दावाही खोटा आहे. सलमान दारू पिऊन भरधाव गाडी चालवत होता आणि त्यामुळेच हा अपघात झाल्याचा युक्तिवाद अॅड. घरत यांनी केला. उद्या गुरुवारीही अॅड. घरत युक्तिवाद करणार आहेत. त्यानंतर सलमन खानतर्फे अॅड. श्रीकांत शिवदे बाजू मांडतील. (प्रतिनिधी)
सलमान दारू प्यायला होता; सरकारी पक्षाचा दावा
By admin | Updated: April 9, 2015 04:30 IST