शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

सलमानने मद्य घेतल्याचे पाहिले नाही; वेटरने दिली साक्ष

By admin | Updated: May 20, 2014 03:37 IST

वांद्रे येथे भरधाव गाडी चालवून चौघांना चिरडणारा अभिनेता सलमान खान हा या घटनेआधी एका प्रसिद्ध बारमध्ये होता

मुंबई : वांद्रे येथे भरधाव गाडी चालवून चौघांना चिरडणारा अभिनेता सलमान खान हा या घटनेआधी तेथील एका प्रसिद्ध हॉटेलमधील बारमध्ये होता, अशी साक्ष सोमवारी एका साक्षीदाराने सत्र न्यायालयात दिली़ हा साक्षीदार वांद्रे येथील जे़ डब्ल्यू़ मॅरीओट या हॉटेलमधील बारमध्ये वेटर असून, मोल्ये बग असे त्याचे नाव आहे़ तो म्हणाला, सलमान त्याच्या मित्रांसोबत त्या दिवशी बारमध्ये आला होता़ मी त्यांना ड्रींकही दिली़ मात्र बारमध्ये मंद प्रकाश असल्याने सलमानने मद्यपान केले की नाही हे सांगता येणार नाही़ सत्र न्यायाधीश डी़डब्ल्यू़ देशपांडे यांच्यासमोर ही साक्ष नोंदवण्यात आली़ त्याचवेळी पोलीस हवालदार लक्ष्मण मोरे यांचीदेखील साक्ष नोंदवण्यात आली़ मोरे हे सलमानचा भाऊ सोहेल खान याचे सुरक्षारक्षक होते़ ते म्हणाले, घटनेच्या दिवशी मी सलमानच्या घराजवळच सुरक्षेसाठी होतो़ त्या रात्री सोहेल व सलमान दोघेही घरात नव्हते़ सोहेल घरी लवकर परतला़ पण सलमान आला नव्हता़ काही वेळाने सलमानच्या गाडीला अपघात झाल्याचे आम्हाला कळाले व आम्ही तत्काळ घटनास्थळी पोहोचलो़ तेव्हा तेथे सलमान नव्हता़ या सुनावणीसाठी सलमान न्यायालयात हजर होता़ राखाडी रंगाचा शर्ट व जिन्समधील सलमान सोमवारी थोडासा तणावमुक्त दिसत होता़ त्याला बघण्यासाठी न्यायालयात गर्दी झाल्याने सलमानला नेमकी साक्ष काय सुरू आहे हेदेखील दिसत नव्हते़ अखेर साक्षीदाराला बघण्यासाठी तो जागेवर उठून उभा राहिला़ साक्षीदार बगने सलमानला न्यायालयात ओळखले़ भरधाव गाडी चालवत सलमानने चौघांना चिरडले़ त्यातील एकाचा मृत्यू झाला़ या प्रकरणी सलमानविरुद्ध वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात भरधाव व निष्काळजीपणे गाडी चालवण्याचा खटला सुरू होता़ गेल्या वर्षी न्यायालयाने सलमानवर सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्यास परवानगी दिली़ या गुन्ह्यासाठी १० वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद असल्याने हा खटला सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला़ (प्रतिनिधी)