शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सलमान , धोनीकडून अनंत अंबानीवर कौतूकाची थाप

By admin | Updated: April 11, 2016 17:04 IST

अथक प्रयत्नाने १८ महिन्यांत १०८ किलो वजन घटविल्याने त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अभिनेता सलमान खानसह भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेही त्याचे कौतुक केले

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ११ - बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या वजनावर नियंत्रण ठेवणे अनेकांसाठी आव्हान बनले असताना उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याने मात्र, अथक प्रयत्नाने १८ महिन्यांत १०८ किलो वजन  घटविल्याने त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अभिनेता सलमान खानसह भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेही त्याचे कौतुक केले आहे.
आयपीएलच्या सुरवातीच्या सत्रांमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे मालक मुकेश अंबानींचा मुलगा अनंत हा आई नीतासोबत सीमारेषेवरील कोचावर बसलेला टीव्हीवर दिसत असे. विश्‍वास बसणार नाही असे तब्बल १०८ किलो वजन घटविण्यात अनंतला यश आले आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतल्या एका पार्टीत त्याचा हा खऱ्या अर्थाने शिडशिडीत बांधा दिसला अन्‌ सोशल मीडियावर चर्चेला उधान आले. अनंत अंबानी हा विषय ट्‌विटरवर ट्रेंड झाला. सहा-सहा तास वर्कआऊट करून त्याने १०८ किलो वजन घटवले.
 
 
धोनीने अनंतला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्याने घटविलेले वजन हेच त्याला वाढदिवसाला मिळालेले मोठे गिफ्ट असल्याचे म्हटले आहे. तर सलमानने अनंतला पाहून आनंद व्यक्त करत, त्याने इच्छाशक्तीच्या जोरावर 108 किलो वजन कमी केल्याचे म्हटले आहे.
 
 १८ महिन्यांत अनंतने त्याच्या दिनचर्येत कोणताही बदल केला नाही. तो रोज पाच ते सहा तास व्यायाम करायचा. त्यानंतर योगसाधना झाल्यावर २१ किमी चालायचा. आहारामध्ये साखरेचा शून्य समावेश होता. अल्प प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आणि त्या जोडीला आवश्यक ते फॅट्स आणि प्रोटीन्स यांचा समावेश करण्यात आला होता.
 
अनंतच्या वजन घटवण्याच्या प्रवासात मी नेहमीच त्याच्याबरोबर होते. त्याची इच्छाशक्ती, अथक प्रयत्न आणि चिकाटीचे दर्शन या काळात मला झाले. आम्ही त्याला सतत प्रोत्साहन देत होतोच. अनंतसाठी ही वाट खूपच खडतर होती, पण त्याने हे करून दाखवले. त्याचा हा १८ महिन्यांचा प्रवास अनेकांना प्रेरणादायी ठरणार आहे. असे  नीता अंबानी म्हणाल्या.