शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

ओशिवरा कारखान्यातील एमडीची विक्री परेदशात

By admin | Updated: July 2, 2015 03:44 IST

राज्य दहशतवादविरोधी पथकाने(एटीएस) उध्वस्त केलेल्या ओशिवरातील हायप्रोफाईल सोसायटीतील कारखान्यात तयार झालेला एमडी हा घातक अमलीपदार्थ मुंबई, महाराष्ट्रासह

मुंबई : राज्य दहशतवादविरोधी पथकाने(एटीएस) उध्वस्त केलेल्या ओशिवरातील हायप्रोफाईल सोसायटीतील कारखान्यात तयार झालेला एमडी हा घातक अमलीपदार्थ मुंबई, महाराष्ट्रासह परदेशात विकला जात होता,अशी माहिती पुढे आली आहे. मध्यपूर्व व युरोपातील ड्रग माफीयांच्या संपर्कात राहून या कारखान्याचा मास्टरमार्इंड साजिद इलेक्ट्रीकवाला आॅर्डरप्रमाणे एमडी तयार करून विकत असे, अशीही माहिती एटीएसला मिळाली आहे.मूळचा बडोद्याचा रहिवासी असलेला साजिद मुंबईसह परेदशातील ड्रग डीलरच्या संपर्कात होता. गेल्या तीन वर्षांपासून तो आॅर्डरप्रमाणे एमडी तयार करून या डीलरना विकत होता. एमडी तयार करण्यासाठी त्याने राज्याबाहेर प्रयोगशाळा तयार केली होती. मात्र ती गुंडाळून तो मुंबईत परतला होता. महिन्याभरापूर्वी त्याने ओशिवऱ्याच्या एकदंत टॉवरमध्ये थ्री बीएचके फ्लॅटमध्ये एमडीचे उत्पादन सुरू केले होते.दोन दिवसांपूर्वी एटीएसच्या चारकोप युनिटने साजिदच्या कारखान्यावर धाड घालून १५१.५ किलो एमडी हस्तगत केले होते. या कारवाईत साजीदसोबत त्याच्या तीन साथीदारांना अटक करण्यात आली. या चौघांच्या चौकशीतून मुंबईतील काही अंमलीपदार्थांच्या छोटया मोठया तस्करांची माहिती पुढे आली आहे. मात्र पोलीलांचे मुख्य लक्ष्य दक्षिण मुंबईतील एक डीलर आहे. त्याने हल्लीच साजीदकडून मोठया प्रमाणावर एमडी विकत घेतल्याची माहिती एटीएसला मिळाली आहे.हायप्रोफाईल ग्राहक : पश्चिम उपनगरात मोठया प्रमाणावर नाईट क्लब, पब आहेत. तसेच बॉलीवूडशी संबंधित अनेकांची निवासस्थाने पश्चिम उपनगरात आहेत. त्यांच्यापर्यंत एमडी सहजरित्या पोहोचवता यावे यासाठी साजिदने ओशिवऱ्यात कारखाना सुरू केला. दरम्यान, साजिदच्या कारखान्यात तयार झालेले एमडी विकत घेणारा ग्राहकवर्गही हायप्रोफाईल असावा, त्यात बॉलीवूडशी संबंधित काहींचा समावेश असावा असा दाट संशय एटीएसला आहे. त्यानुसार एटीएस तपास करत असल्याची माहिती मिळते. कोडवर्ड नमक : साजिदच्या कारखान्यात तयार झालेल्या एमडीला मुंबईसह परदेशात नमक हा कोडवर्ड देण्यात आला होता.