शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

सालेमचा निकाल १६ जूनला

By admin | Updated: May 30, 2017 04:24 IST

१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा निकाल १६ जूनला देणार असल्याचे सोमवारी विशेष टाडा न्यायालयाने जाहीर केले. अबू सालेमसह मुस्तफा डोसा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : १९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा निकाल १६ जूनला देणार असल्याचे सोमवारी विशेष टाडा न्यायालयाने जाहीर केले. अबू सालेमसह मुस्तफा डोसा, अब्दुल कय्युम, शेख फिरोज खान, ताहीर मर्चंट, रियाझ सिद्दिकी आणि करीमुल्ला शेख यांच्याबाबत न्यायालय या दिवशी निकाल देणार आहे.१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी याकुब मेमन याला ठोठावलेल्या शिक्षेनुसार त्याला जुलै २०१५ मध्ये फाशी देण्यात आली. सध्या सुरू असलेल्या खटल्यातील सात आरोपी मूळ खटला सुरू झाल्यानंतर पोलिसांच्या हाती लागल्याने न्यायालयाने आधी १२३ आरोपींवरील खटला पूर्ण केला. त्यानंतर या सात जणांवर खटला चालवला. १९९३ मुंबई बॉम्बस्फोटाची ‘केस बी’ म्हणून या सात जणांवरील खटला चालवण्यात येत आहे. अबू सालेमला पोर्तुगालमधून आणण्यात आले, तर मुस्तफा डोसाला यूएईमधून अटक करण्यात आले. मात्र मला पोलिसांनी अटक केली नसून आपणच तपास यंत्रणेपुढे शरणागती पत्करल्याचा दावा डोसा करत आहे. या केसमधील आणखी काही आरोपी अद्याप फरारी आहेत. या हल्ल्याचा सूत्रधार दाऊद इब्राहिम, मोहम्मद डोसा आणि टायगर मेमन हे फरारी आहेत. त्यांचा शोध सुरू असला तरी अद्याप ते पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.अभिनेता आणि १९९३ च्या खटल्यातील आरोपी संजय दत्त याला शस्त्र पुरवल्याचा आरोप अबू सालेमवर आहे. तर संजय दत्तच्या घरी शस्त्रास्त्रे पोहोचवल्याचा आरोप कय्युमवर आहे. याच प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या मुस्तफा डोसावर बॉम्बस्फोट करण्यासाठीचा कट रचल्याचा व त्यासाठी नियोजित स्थळी शस्त्रास्त्रे उतरवल्याचा आरोप आहे. तर ताहीरवर या प्रकरणातील अन्य आरोपींची पाकिस्तानमध्ये जाण्याची सोय केल्याचा आरोप आहे. गेली सहा वर्षे खटला सुरूबॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेमला पोर्तुगालमधून तर मुस्तफा डोसाला यूएईमधून अटक करण्यात आली. बॉम्बस्फोटाचा हा दुसरा खटला गेली सहा वर्षे सुरू आहे. पहिल्या खटल्यात १२९ जणांनी दिलेल्या कबुलीजबाबावर सरकारी वकील अवलंबून आहेत. १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत १२ बॉम्बस्फोट करण्यात आले. या बॉम्बस्फोटासाठी ३००० कि.ग्रॅ.पेक्षा अधिक आरडीएक्स देशात आणण्यात आले. त्यातील केवळ दहा टक्केच आरडीएक्स वापरण्यात आले. या बॉम्बस्फोटात २५७ लोकांचा मृत्यू झाला.