शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बियाण्यांची वाढीव दराने विक्री!

By admin | Updated: June 20, 2016 01:57 IST

लोकमत स्टींग ऑपरेशनदरम्यान बियाण्यांची दरवाढ रद्द करण्याच्या ‘महाबीज’च्या आदेशाला बियाणे विक्रेत्यांद्वारे केराची टोपली दाखवली जात आहे.

अकोला : शेतकर्‍यांच्या रोषानंतर बियाण्यांची दरवाढ रद्द करण्याचा निर्णय राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) घेतला असला, तरीही अकोल्यात वाढीव दरानेच बियाण्यांची विक्री करण्यात येत आहे. 'लोकमत'ने केलेल्या 'स्टिंग ऑपरेशन'मधून हे वास्तव उघडकीस आले असून आधीच दुष्काळाने पोळलेल्या शेतकर्‍याला महागड्या बियाण्यांच्या खरेदीची तोशिस सोसावी लागत आहे.महाबीजच्या बियाण्यांमध्ये या वर्षी ३५ ते ४५ टक्के वाढ करण्यात आल्यानंतर शेतकर्‍यांमध्ये प्रचंड नाराजी होती. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार 'महाबीज'ने गतवर्षीच्या दरातच बियाण्यांची विक्री करण्याचा निर्णय शनिवार घेतला. राज्यातील सर्व बियाणे विक्रेत्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी रविवारपासून तात्काळ करण्याचे आदेश महाबीज प्रशासनाने परिपत्रकाद्वारे दिले आहेत.गतवर्षीच्या खरीप हंगामात 'महाबीज'मार्फत तूर १३0 रुपये प्रतिकिलो, मूग १३५ रुपये प्रतिकिलो व उडीद बियाण्याची ११0 रुपये प्रतिकिलो या दराने बियाणे विक्री करण्यात आली होती. मात्र 'लोकमत' चमूने रविवारी शहरातील बियाणे बाजारात दरांची पाहणी केली, त्या वेळी महाबीजच्या तुरीचे दर १५0 ते १७0 रुपये प्रतिकिलो, उडिदाचे दर १६0 ते २00 रुपये प्रतिकिलो, तर मुगाचे दर २१0 रुपये प्रतिकिलो असल्याचे विविध बियाणे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.शेतक-यांना हेलपाटेगतवर्षीच्या दरापेक्षा जास्त दराने ज्या शेतकर्‍यांनी तूर, मूग व उडीद बियाण्याची खरेदी केली आहे, अशा शेतकर्‍यांनी संबंधित कृषी अधिकार्‍यांकडे बियाणे खरेदीची पावती, टॅग व बँक खाते क्रमांक सादर केल्यास फरकाची रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे महाबीजच्या परिपत्रकात म्हटले आहे. मात्र पेरणी तोंडावर आली असताना कृषी अधिकार्‍यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना बिलं सादर करण्याची खटपट शेतकर्‍यांना करावी लागणार आहे.