शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या ‘युनायटेड स्पिरिट’ची मल्ल्यांकडून विक्री

By admin | Updated: March 12, 2016 04:15 IST

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील ‘युनायटेड स्पिरिट’ या कंपनीची विजय मल्ल्या यांनी अमेरिकन कंपनी ‘डायगो’ला काही महिन्यांपूर्वी विक्री केली आहे.

औरंगाबाद : चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील ‘युनायटेड स्पिरिट’ या कंपनीची विजय मल्ल्या यांनी अमेरिकन कंपनी ‘डायगो’ला काही महिन्यांपूर्वी विक्री केली आहे. ‘डायगो’ने आता कोकण अ‍ॅग्रोला ही कंपनी भाडेतत्त्वावर दिली आहे. उपरोक्त व्यवहाराची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) नोंद नाही. मात्र, ‘युनायटेड स्पिरिट’च्या जागी ‘डायगो’ व ‘कोकण अ‍ॅग्रो’ यांच्या नावाने उत्पादन शुल्काचा भरणा होत आहे.चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत मल्ल्या यांची ‘युनायटेड स्पिरिट’ ही कंपनी आहे. महाराष्ट्र डिस्टिलरीज लिमिटेड, शॉ वॉलेस डिस्टिलरीज लि., मॅक्डॉवेल अ‍ॅण्ड कंपनी लि. आणि त्यानंतर ‘युनायटेड स्पिरिट लि.’ असा या कंपनीचा प्रवास झाल्याची नोंद ‘एमआयडीसी’च्या रेकॉर्डमध्ये ९ जून २०१४ रोजी घेण्यात आली होती. मल्ल्या यांनी ‘डायगो’ला विक्री केल्याची नोंद मात्र दप्तरी नाही. स्थानिक बँकांची देणी चुकती‘डायगो’ला विक्री होण्यापूर्वी युनायटेड स्पिरिटच्या नावावर औरंगाबादेतील काही बँकांकडून कर्ज घेण्यात आले होते. या कर्जाची मात्र त्यांनी परतफेड केली असल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते. ‘युनायटेड स्पिरिट’ने स्टँडर्ड चार्टर्ड बँकेकडून २५५ कोटी रुपये, पंजाब नॅशनल बँकेकडून १२८ कोटी रुपये, ‘सिकॉम’कडून १५ कोटी रुपये, जनता सहकारी बँकेकडून २ कोटी रुपये, तर फेडरल बँकेकडून ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जांची परतफेड केल्याच्या नोंदी ‘एमआयडीसी’कडे आहेत.