शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

...तर सज्जादला पॅरोलच मिळाला नसता

By admin | Updated: June 27, 2016 04:51 IST

पूरकायस्थ प्रकरणाची पार्श्वभूमी पाहता, तुरुंगाधिकाऱ्यांकडे अधिकार असते, तर गुन्हेगार सज्जाद मुगल याला कदापि पॅरोल मंजूर मिळालाच नसता.

डिप्पी वांकाणी,

मुंबई- पल्लवी पूरकायस्थ प्रकरणाची पार्श्वभूमी पाहता, तुरुंगाधिकाऱ्यांकडे अधिकार असते, तर गुन्हेगार सज्जाद मुगल याला कदापि पॅरोल मंजूर मिळालाच नसता. या प्रकरणात डीआयजी राजेंद्र धामणे हे लवकरच गृह विभागाला अहवाल सादर करणार आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ तुरुंगाधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.तुरुंगातील कैद्यांना पॅरोल देण्याचा अधिकार हा पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाच्या तुरुंग अधिकाऱ्याकडे असावा, असा प्रस्ताव तुरुंग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून दोन वर्षांपूर्वी सरकारला देण्यात आला होता, पण सरकारने हा प्रस्ताव फेटाळला होता. महसूल विभागाच्या विभागीय आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे हा अधिकार नसावा. कारण एखाद्या कैद्याची गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी आणि त्यातील संवेदनशीलता ही त्या अधिकाऱ्याला माहीत नसते, असेही मत तुरुंंगाधिकाऱ्यांनी मांडले होते. तुरुंगातील डीआयजी दर्जाच्या अधिकाऱ्यांना काही दिवसाची सुट्टी देण्याचा अधिकार आहे, पॅरोल देण्याचा अधिकार नाही. याबाबत सविस्तर माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, ज्या कैद्यांनी दोन वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ तुरुंगात काढला आहे, अशा कैद्यांना फर्लो घेण्याचा अधिकार आहे, तर पॅरोल हा विशेष कारणासाठी मागितला जातो. मुंबईत वडाळ्याच्या भक्ती पार्क येथे सिक्युरिटी गार्ड सज्जाद मुगलने अ‍ॅड. पल्लवी पूरकायस्थ यांची त्यांच्या निवासस्थानी हत्या केली होती. याच वर्षी फेब्रुवारीत आई आजारी असल्याच्या कारणास्तव सज्जादला ३० दिवसांचा पॅरोल मंजूर झाला होता. सज्जाद ३० दिवसांत परत येईल, याची हमी त्याचे वडील आणि भाऊ यांनी घेतली होती. तथापि, फर्लो सुट्टी मंजूर करताना घरातील व्यक्तीशिवाय दुसरी हमी घेणारी व्यक्ती हा सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य वा शिक्षक असावा, असा तुरुंग प्रशासनाचा नियम आहे. त्यामुळे सुट्टीवरील गुन्हेगार परत येण्याची अधिकाधिक शक्यता असते, असेही सूत्रांनी सांगितले. >तुरुंगाधिकारी सक्षमसज्जादला काश्मीरमधून अटक केली होती. तुरुंग अधिकाऱ्यांना अशा प्रकरणाची पार्श्वभूमी माहिती असते, जी विभागीय आयुक्तांना नसते. गुन्हेगाराचा तुुरुंंगातील एकूण व्यवहार कसा आहे, याची माहिती तुरुंग अधिकाऱ्याला असते, पण विभागीय आयुक्त हे अशा प्रकरणात तज्ज्ञ असतातच असे नाही. त्यामुळे हे अधिकार तुरुंगाधिकाऱ्यांकडे असते, तर सज्जाद फरारझाला नसता.