लोकमत न्यूज नेटवर्कशिर्डी : गुरूपौर्णिमा उत्सवात साईचरणी तब्बल साडेपाच कोटींची गुरूदक्षिणा अर्पण झाली आहे. संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांनी ही माहिती दिली़ ८ ते १० जुलै दरम्यान शिर्डीत १०९ वा गुरूपौर्णिमा उत्सव साजरा झाल्यानंतर संस्थानच्या दान पेट्यांची मोजदाद करण्यात आली़ दक्षिणा पेटीत २ कोटी ९४ लाख, देणगी कक्षात १ कोटी ४ लाख, डेबीट व क्रेडीट कार्डद्वारे २९ लाख ६७ हजार, आॅनलाईन देणगी २२ लाख ८० हजार, चेक व डीडीद्वारे देणगी ३१ लाख २० हजार, ५९ लाख रूपयांचे २२३३़९०० ग्रॅम सोने, २ लाख ४३ हजार रूपयांची ८४०१ ग्रॅम चांदी तसेच जवळपास वीस देशातील ९ लाख तीस हजारांच्या परकीय चलनाचा समावेश आहे़संस्थानकडे सध्या जवळपास ४०० किलो सोने, साडेचार हजार किलो चांदी तर वेगवेगळ्या राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये १८०० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.
सार्इंना साडेपाच कोटींची गुरूदक्षिणा
By admin | Updated: July 12, 2017 04:19 IST