शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र शासनावर संतांची नाराजी

By admin | Updated: December 29, 2016 20:08 IST

देशात सत्ताबदल झाल्यानंतर गोरक्षा, राममंदिराबाबत सकारात्मक पावले उचलण्यात येतील

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 29 - देशात सत्ताबदल झाल्यानंतर गोरक्षा, राममंदिराबाबत सकारात्मक पावले उचलण्यात येतील, अशी अपेक्षा होती. मात्र याबाबतीत कुठलेही अनुकूल वातावरण दिसून येत नाही. देशात अच्छे दिन आल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात त्याची अनुभूती कुठेही येत नाही, या शब्दांत स्वामी मंगलगिरी आश्रमचे स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी केंद्र शासनावर टीकास्त्र सोडले आहे. विशेष म्हणजे विश्व हिंदू परिषदेच्या मंचावरुन त्यांनी या भावना व्यक्त केल्या.गुरुवारपासून नागपुरातील मॉं उमिया धाम येथे विहिंपच्या केंद्रीय व्यवस्थापन समिती व प्रतिनिधी मंडळाच्या संयुक्त अधिवेशनाला सुरुवात झाली. उद्घाटन सत्राला उपस्थित अडीचशेहून अधिक प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना गोविंदगिरी महाराजांनी केंद्राच्या धोरणांवर असमाधानी असल्याचे सांगितले. गोरक्षा व राममंदिराबाबत सकारात्मक पावले उचलण्यात आलेली नाही. आपल्या विचारांचे शासन सत्तेत आल्यावर बऱ्याच समस्या दूर होतील, असे वाटत होते. परंतु असे पूर्णपणे झालेले नाही. संस्कृतसारखी देशाची भाषा दुर्लक्षितच आहे, असे ते म्हणाले. यावेळी संघ परिवारातील समन्वयावरदेखील भाष्य केले. विहिंपकडून हिंदू समाजाला एकत्र बांधण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे संघाकडूनदेखील धर्मजागरण विभागाच्या माध्यमातून काम सुरू आहे. अशा स्थितीत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे समन्वयावर जास्तीत जास्त भर देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.प्रवीण तोगडिया, राष्ट्रीय अध्यक्ष राघव रेड्डी, महामंत्री चंपत राय, विदेश विभागाचे कार्याध्यक्ष अशोक चौगुले, जितेंद्रनाथ महाराज प्रामुख्याने उपस्थित होते.विहिंपने तयार केला देशव्यापी हिंदू सुरक्षा कृती आराखडादेशातील अनेक ठिकाणी हिंदू समाजावरील हल्ले वाढले आहे. हिंदू समाज या देशातच असुरक्षित असल्याचे दिसून येत असून त्यांच्या सुरक्षेसाठी विहिंपतर्फे देशव्यापी हिंदू सुरक्षा कृती आराखडा तयार करण्यात आल्याचे डॉ. प्रवीण तोगडिया यांनी सांगितले. अयोध्येत राममंदिराची निर्मिती व्हावी यासाठी चतुसूत्री तयार करण्यात आली आहे. राम मंदिराची निर्मिती ही ठरलेल्या प्रारुपानुसार रामजन्मभूमी न्यासाकडूनच होईल. तसेच मंदिराची एक इंच जागाही कुणाला देणार नाही. आहे त्याच जागेवर मंदिर तयार करण्यात येईल. यासंदर्भात संसदेत कायदादेखील बनविण्यात यावा, अशी मागणी यावेळी तोगडिया यांनी केली.आंदोलनाचा मार्ग मोकळागो हत्येच्या प्रकरणांवर तोगडिया यांनी नाराजी व्यक्त केली. गोहत्या बंदीची अंमलबजावणी प्रभावी पद्धतीने होण्याची आवश्यकता आहे. जर कुणी आमचे ऐकणारच नसेल तर आंदोलनाचा मार्ग मोकळा आहे, या शब्दांत त्यांनी केंद्र शासनाला इशाराच दिला.