शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील सराईत घरफोडी टोळीस अटक

By admin | Updated: July 15, 2015 00:52 IST

दोन महिलांसह सातजणांचा समावेश : आलिशान गाडीसह हत्यारे जप्त

कोल्हापूर : पर्यटनास आल्याचे भासवून शहरातील बंद दुकाने मध्यरात्रीच्या दरम्यान फोडून लाखो रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या मुंबईतील घरफोड्या टोळीस मंगळवारी लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. या टोळीमध्ये दोन महिलांसह सातजणांचा समावेश आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी एक आलिशान गाडी व घरफोडीसाठी वापरली जाणारी हत्यारे जप्त केली. संशयित आरोपी महंमद आरीफ अब्दुलहब शेख (वय २९), विजय सूर्या शेट्टी (४०), दीपक मना डे (२९), किशोर चंद्रकांत साळवी (३०), विजय ऊर्फ मुन्ना विठ्ठल जागडे (३४), फातिमा फिरोज खान (२९), रमजानबी समास्तू अब्दुलहब शेख (२९, सर्व रा. मानखुर्द, मुंबई) अशी त्यांची नावे आहेत. या सर्व आरोपींना आज, बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी, लक्ष्मीपुरी येथील संजय अशोक काजवे (३५) यांच्या मालकीचे गोल्डन टोबॅको नावाचे दुकान आहे. ४ जूनला मध्यरात्री दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दोन लाख ८० हजार रुपये लंपास केले होते. या प्रकरणी दुकानमालक काजवे यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दिली होती. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत चोरट्यांचे छायाचित्र रेकॉर्डिंग झाले होते. त्यावरून पोलिसांनी चोरट्यांचे फोटो काढून ते राज्यातील पोलिसांच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर पाठविले. यावेळी मुंबईतील एका पोलिसाने हे चोरटे मुंबईतील असल्याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना दिली. या चोरट्यांवर नाशिक, सुरत, राजस्थान, आदी ठिकाणी घरफोडीचे गुन्हे दाखल असून, पोलीस त्यांच्या मागावर असल्याची माहिती हाती आली. त्यानुसार गुन्हे शाखेचे युवराज आठरे, कॉन्स्टेबल अजिज शेख, भारत कांबळे, राहुल देसाई, अजित वाडेकर, संदीप कापसे, अस्मिता सुतार, आदींचे पथक मुंबईला रवाना झाले. यावेळी मानखुर्द परिसरातील झोपडपट्टीमध्ये वास्तव्यास असलेल्या या संशयित टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. त्यांना तेथून कोल्हापुरात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आणले. यावेळी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आलिशान गाडीमधून आम्ही सर्वत्र फिरत असतो. पर्यटनास आल्याचे भासवून मध्यरात्री बंद दुकाने फोडून दुसऱ्या शहरात जात असतो. अनेकवेळा रात्रीच्या वेळी गस्तीवरील पोलिसांनी आम्हाला अडविले होते. त्यावेळी गाडीमध्ये फॅमिली पाहून त्यांनी आम्हाला सोडून दिले होते. महिला व लहान मुले सोबत असल्याने आम्ही चोर आहोत, हे कोणाच्याच लक्षात येत नव्हते, अशी कबुली दिली. आलिशान गाडीमध्ये घरफोडीसाठी लागणारे साहित्य त्यांनी ठेवले होते. रोज एका शहरात घरफोडी करून मिळणाऱ्या पैशातून ते चैनी करीत असत. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी सांगितले.