शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील सराईत घरफोडी टोळीस अटक

By admin | Updated: May 23, 2017 01:16 IST

एका महिलेसह चौघांचा समावेश : कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्रात गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : पर्यटनास आल्याचे भासवून शहरातील बंद दुकाने मध्यरात्रीच्या दरम्यान फोडून लाखो रुपयांची रोकड व मुद्देमाल लंपास करणाऱ्या मुंबईतील घरफोड्या टोळीस सोमवारी लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. या टोळीमध्ये एका महिलेसह सातजणांचा समावेश आहे. त्यांच्याकडून एक आलिशान गाडी व घरफोडीसाठी वापरली जाणारी हत्यारे, चोरीचे मोबाईल, असा सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांनी लक्ष्मीपुरी, कोंडाओळ येथील मोबाईल शॉपीसह औषध दुकान फोडल्याची कबुली दिली असून यातून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. संशयित आरोपी मुस्तफा अब्दुलहमीद पावसकर (वय ३६, रा. सिक्कीनगर, मुंब्रा, ठाणे), नुरमहंमद करीम शेख ऊर्फ लड्डू (४०, रा. कर्नाक बंदर, व्हीटी), दिनेश विजय मुदलियार (३५, रा. मस्जिद बंदर, पी. डी. माला रोड, व्हीटी), फातिमा फिरोज खान (३१, रा. कोळीवाडा, वडाळा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक अशा विविध राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यांना आज, मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, लक्ष्मीपुरी कोंडाओळ येथील ‘द सेल सिटी’ या दुकानासह औषध दुकान फोडून दोन लाख रुपये कि मतीचा मुद्देमाल चोरट्यांनी शनिवारी (दि. २०) लंपास केला होता. याप्रकरणी शाहीद महमद ढोले (वय २८, रा. दुधाळी पॅव्हेलियन) यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दिली. रात्रीत दोन दुकाने फोडल्याने व्यापारी वर्गात भीती पसरली होती. या घरफोडीचा तपास करीत असताना सीसीटीव्ही फुटेजवरून क्वालिस गाडी (एमएच ०४ सीडी १४४५) लक्ष्मीपुरी परिसरात संशयितरीत्या फिरताना दिसून आली. प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांच्याकडून या गाडीच्या मालकाचा शोध घेतला असता आरिफ जाफरअली शेख (रा. कौसा, ता. मुंब्रा, जि. ठाणे) याची असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी या गुन्ह्णातील संशयितांचा शोध घेण्यासाठी दोन पथके तत्काळ मुंबईला पाठविली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक युवराज आठरे, लक्ष्मीपुरीचे दादा पवार यांनी संयुक्तरीत्या कारवाईची आखणी करून गाडीमालक आरिफ शेख याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याने दोन दिवसांपूर्वी मुस्तफा पावसकर याला गाडी भाड्याने दिल्याचे सांगितले. पावसकर याच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे समजले. तो सिक्कीनगर येथे असल्याची माहिती मिळताच तेथून त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्यासोबत नुरमहंमद शेख, दिनेश मुदलियार, फातिमा खान मिळून आले. या सर्वांना ताब्यात घेऊन कोल्हापूरला आले. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी चोरीची कबुली दिली. कोल्हापुरात दुसऱ्यांदा घरफोडीलक्ष्मीपुरी येथील संजय अशोक काजवे यांच्या मालकीचे गोल्डन टोबॅको नावाचे दुकान आहे. ४ जून २०१५ ला मध्यरात्री दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दोन लाख ८० हजार रुपये लंपास केले होते. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत चोरट्यांचे छायाचित्र रेकॉर्डिंग झाले होते. त्यावरून पोलिसांनी चोरट्यांचे फोटो काढून ते राज्यातील पोलिसांच्या व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर पाठविले. यावेळी मुंबईतील एका पोलिसाने हे चोरटे मुंबईतील असल्याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना दिली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या संशयित टोळीच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यानंतर दोन वर्षांनी पुन्हा कोल्हापुरात येऊन त्यांनी घरफोडी केली. त्यांच्या टोळीमध्ये आणखी काही संशयितांचा समावेश आहे.