शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

संततधारेने शहरवासीयांची तारांबळ

By admin | Updated: September 21, 2016 03:13 IST

सोमवारपासून पावसाने जोर धरला असून मंगळवारी पहाटेपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने नागरिकांचे हाल झाले.

नवी मुंबई : सोमवारपासून पावसाने जोर धरला असून मंगळवारी पहाटेपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने नागरिकांचे हाल झाले. नवी मुंबईबरोबरच खारघर, पनवेल, उरण परिसरातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोमवारपासून वातावरणात काहीसा बदल झाला असून हवेत गारवा पसरला आहे. सकाळी कामावर जाणार नोकरदारवर्ग, शाळकरी विद्यार्थ्यांची मात्र तारांबळ उडाली, पावसाने क्षणभरही विश्रांती न घेतल्याने भुयारी मार्ग,बसस्थानके तसेच सखल पाणी साचल्याच्या घटना घडल्या.पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक धीम्या गतीने सुरु होती त्यामूळे प्रवाशांना वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानकाजवळील टेकडीवर असलेले मोठे वृक्ष उन्मळून पडल्याची घटना घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. महापालिका आपत्कालीन विभाग तसेच अग्नीशमन दलाच्या वतीने या ठिकाणी तात्काळ भेट देऊन प्रवाशांच्या मार्गातील अडथळा दूर केला. सकाळी साडेआठ वाजेपासून ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत बेलापूर विभागात ४५.० मिमी, नेरुळमध्ये ४७.०मिमी, वाशीत ६१.५ मिमी, ऐरोलीत ५४.०२ मिमी असा एकूण ५२.०२ मिमी पावसाची नोंद झाली. मोरबे धरणची जलपातळी ८३.४८मीटर इतकी नोंद झाली. ऐरोली सेक्टर ५ येथील मार्केट परिसरात कचरा अडकून नाला तुंबल्याची घटना घडली. रेल्वे वाहतूक सुरळीतपणे सुरु असल्याने रेल्वे प्रवाशांना फारसा अडचणींचा सामना करावा लागला नाही. खड्ड्यांमुळे सायन-पनवेल महामार्गावर प्रवाशांचे हाल झाले.