शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

साई मंदिर, जागांचे हस्तांतरण बेकायदा

By admin | Updated: March 7, 2017 04:36 IST

साईबाबा संस्थानने गेल्या शंभर वर्षात मंदिर परिसरातील अनेक जागांचे अनधिकृत हस्तांतरण व शर्तभंग केल्याची बाब महसूल विभागाच्या निदर्शनास आली

प्रमोद आहेर,शिर्डी- साईबाबा संस्थानने गेल्या शंभर वर्षात मंदिर परिसरातील अनेक जागांचे अनधिकृत हस्तांतरण व शर्तभंग केल्याची बाब महसूल विभागाच्या निदर्शनास आली आहे. या पार्श्वभूमीवर राहाता तहसीलदारांनी संस्थानच्या ताब्यातील या जागा नियमानुकूल करण्यासाठी जवळपास चार कोटी रुपये दंड भरण्याची नोटीस बजावल्याचे शिर्डीचे प्रांताधिकारी कुंदन सोनवणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. आगामी सहा महिन्यांनंतर साईसमाधी शताब्दी सोहळा सुरू होत आहे़ त्या पार्श्वभूमीवर ‘शिर्डी गॅझेटिअर’ (‘अनटोल्ड स्टोरीज’‘ साईआगमन ते समाधी शताब्दी ’) या संदर्भ ग्रंथासाठी मंदिर व परिसराची माहिती देताना प्रांताधिकारी कुंदन सोनवणे यांच्या ही बाब लक्षात आली़ त्यानंतर तहसीलदार माणिक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार राहुल कोताडे व अभिलेख कक्षातील कर्मचाऱ्यांनी गेले तीन दिवस १९०० पासूनच्या ब्रिटीशकालीन कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर संस्थानच्या ताब्यातील विशेषत: मंदिर व परिसरातील मोफत सर्व्हे क्रमांक एकमधील अनेक जागांचे हस्तांतरण अनधिकृतपणे झाल्याचे व त्या माध्यमातून शर्तभंग झाल्याचे निदर्शनास आले़ जवळपास २६़ ७१ गुंठे जागेच्या व्यवहारात शर्तभंग झाल्याचा नोटिसीत उल्लेख आहे. या जागा नियमानुकूल करण्यासाठी मूल्यांकनाच्या ७५ टक्के रक्कम (३ कोटी ९० लाख ६३ हजार) शासन जमा करणे आवश्यक आहे. ही रक्कम संस्थानकडून का वसूल करण्यात येऊ नये किंवा शर्तभंग प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव का पाठविण्यात येऊ नये, याबाबतचा लेखी खुलासा सात दिवसांत करावा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार माणिक आहेर यांनी या नोटिसीद्वारे दिला आहे़।दुर्दैवाने गेल्या अनेक वर्षात संस्थानने लँड रेकॉर्डवर पुरेसे लक्ष दिले नाही़ आता बाबांच्या समाधीला शंभर वर्षे होत असताना ही बाब समोर आली़ या निमित्ताने संस्थानच्या जागांचे रेकॉर्ड दुरूस्त होऊन कायदेशीर होऊ शकेल.-कुंदन सोनवणे, प्रांताधिकारीअद्याप नोटीस मिळालेली नाही़ मात्र अनेक वर्षांपूर्वींचा विषय आहे़ याबाबत अभ्यास करुन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.- बाजीराव शिंदे , संस्थानचे कार्यकारी अधिकारी