शुल्कवाढ : सभासदत्वासाठी अधिक पैसे मोजावे लागणारशिर्डी (अहमदनगर) : साईबाबा संस्थानच्या भक्त मंडळ सभासदत्वाच्या शुल्कात भरमसाठ वाढ करुन संस्थानने नववर्षाचा भाविकांना चांगलाच शॉक दिला आहे़ कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय १ जानेवारीपासून ही नवीन दरवाढ लागू होत आहे.संस्थानचा विश्वस्त होण्यासाठी भक्त मंडळाचे किमान आजीव सभासदत्व आवश्यक असल्याने आता विश्वस्त होणेही महागले आहे़ ११ ते १,५०० रुपये असलेले शुल्क थेट ३ हजार ते ५ लाख रुपये करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सभासदत्व फी वाढवली असली तरी सुविधेत मात्र काहीही वाढ केलेली नाही़ उदी प्रसाद व निमंत्रण पाठवण्याचा वाढलेला खर्च विचारात घेवून ही वाढ केल्याचा अजब दावा करण्यात येत आहे़ गेल्या वर्षी संस्थानच्या बदललेल्या अधिनियमात तरतूद करण्यात आली असून राज्य सरकारने या अधिनियमाला परवानगी दिल्याने ही वाढ अटळ असल्याचे बोलले जाते़ (प्रतिनिधी)दीड हजारावरून ५ लाख!संस्थानच्या जुन्या घटनेप्रमाणे साईभक्तांचे भक्त मंडळ होते़ यात आश्रयदाते,आजीव व सर्वसाधारण (वार्षिक) असे तीन प्रकार आहेत़ सध्या तीनही प्रकार मिळून जवळपास दोन लाख भाविक सभासद आहेत़ आजवर आश्रयदाता सभासद होण्यासाठी पंधराशे रुपये आकारले जात. आता नवीन दरानुसार आश्रयदाता होण्यासाठी भाविकांना तब्बल पाच लाख रूपये मोजावे लागतील़ तर आजीव सभासद होण्यासाठी पन्नास हजार रूपये द्यावे लागतील.
साई संस्थानचे विश्वस्त होणे महागले !
By admin | Updated: January 1, 2015 02:41 IST