शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

साईबाबांची उपासना सर्वथा अनुचित - शंकराचार्य

By admin | Updated: August 25, 2014 03:54 IST

शिर्डीचे साईबाबा ‘अचेतन, असत्य आणि अयोग्य’ आहेत. सनातन धर्माच्या दृष्टीने त्यांची पूजा आणि उपासना करणे सर्वथा अनुचित आहे

जयशंकर गुप्त, कवर्धाशिर्डीचे साईबाबा ‘अचेतन, असत्य आणि अयोग्य’ आहेत. सनातन धर्माच्या दृष्टीने त्यांची पूजा आणि उपासना करणे सर्वथा अनुचित आहे, असे ज्योतिष आणि द्वारका, शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी म्हटले आहे.साईबाबांविरुद्धच्या आपल्या मोहिमेंतर्गत श्री शंकराचार्य जन कल्याण न्यासद्वारा छत्तीसगडच्या रायपूरपासून १३० कि.मी.वर असलेल्या कवर्धा येथे आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंसदेला संबोधित करताना स्वरूपानंद बोलत होते. येथे जमलेले संत महात्मा आणि विचारक या मुद्यांशी संबंधित विविध पैलूंवर विचार करतील आणि निर्णय घेतील. तो जनता आणि हिंदू समाजाला मान्य असेल. साईबाबांची मूर्ती तोडणे आणि या प्रकरणात कोणत्याही प्रकारच्या हिंसेला आपले समर्थन नाही. आम्ही त्यांना अस्तित्वहीन मानतो, तेव्हा त्यांच्या मूर्ती का तोडावी, असेही ते म्हणाले. गेल्या चार महिन्यांपासून शंकराचार्य येथे आहेत. ते म्हणाले की, ते एकटे एक व्यक्ती नाही तर संस्था आहेत. आपण सनातन धर्मीय अनेक विषयांवर एकजूट होऊ शकतो. अयोध्येत राम जन्मभूमी मंदिर निर्माण मुद्यांवर हिंदूंची एकजूट होत आहे. हिंदूंची एकजूट परदेशी लोकांना नको आहे, असेही ते म्हणाले. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांचा कवर्धा हा गृहजिल्हा आहे. धर्मसंसदेच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या पोस्टर-बॅनर्स आणि कटआऊट््स मध्ये रमणसिंग यांच्या मोठमोठ्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. परंतु मुख्यमंत्री स्वत: या कार्यक्रमात दिसले नाही.