न्यू यॉर्क : गेल्या सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर मुंबई ते न्यू यॉर्क प्रवासात असणारे दोन प्रवासी फडणवीस यांच्या बचावासाठी पुढे आले असून, त्यांनी या विमानाला मुख्यमंत्र्यांमुळे उशीर झाला नाही असा दावा केला आहे. मुख्यमंत्र्यांनी याआधीच भारतात परतल्यानंतर संबंधितांवर मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. २९ जून रोजी एअर इंडियाचे मुंबई ते न्यू यॉर्क या विमानाचे उड्डाण एक तास विलंबाने झाले होते. या विमानाला मुख्यमंत्र्यांचे सहकारी प्रवीण परदेशी यांच्यामुळे उशीर झाला, असे वृत्त प्रसिद्ध झाल्याने मुख्यमंत्री संतप्त झाले व त्यांनी टिष्ट्वटरवर संबंधितांवर मानहानीजनक दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता. समर्थकांचे टिष्ट्वट एअर इंडियाच्या एआय-१९१ या फ्लाईटमध्ये मीही होतो. मुख्यमंत्री फडणवीस व त्यांचे शिष्टमंडळ वेळेत आले; पण इमिग्रेशनसंबंधी समस्येमुळे प्लेनचे उड्डाण उशिरा झाले असे दुष्यंत नावाच्या युजरने टिष्ट्वट केले आहे. दुष्यंत कागरावा असे त्याचे पूर्ण नाव असून, तो उदयपूर येथील मुक्त पत्रकार आहे. अन्य टिष्ट्वटर युजर अरविंद शहा यांनी फडणवीस यांनी विमान थांबवले नाही, ते फाईल वाचत होते, असे म्हटले आहे. कॉँग्रसने मात्र हे प्रकरण लावून धरले होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बचावासाठी आले सहप्रवासी
By admin | Updated: July 4, 2015 03:04 IST