शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

‘सह्याद्री’त पाच वाघोबांचा वावर!

By admin | Updated: January 21, 2015 01:52 IST

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात पाच वाघ असल्याबाबत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) शिक्कामोर्तब केले आहे

सातारा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात पाच वाघ असल्याबाबत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) शिक्कामोर्तब केले आहे. या क्षेत्रात कोयना व चांदोली अभयारण्यांचा समावेश होतो.२०१४ मध्ये ‘एनटीसीए’च्या तीन सदस्यांच्या समितीने ‘सह्याद्री’ला भेट दिली होती. वाघांचे अस्तित्व मान्य करण्यासाठीचे निकष अत्यंत कठीण होते. वाघाचे प्रत्यक्ष दर्शन आणि जमा केलेल्या नमुन्यांमधील केवळ ‘डीएनए’ यावरच भरवसा ठेवला जाणार होता. प्रशासनाने एकंदर ११ नमुने पाठविले होते. पाटण तालुक्यातील पाच गावांचे पुनर्वसन झाल्यानंतर तेथील शेतजमिनीत नैसर्गिक कुरणे तयार करण्यात येऊन त्यावर तृणभक्षी वन्यजीव चांगल्या प्रकारे पोसले जातील, याची दक्षता घेण्यात आली. तसेच सागरेश्वर अभयारण्य आणि पुण्याच्या राजीव गांधी उद्यानातून २० सांबर आणि चितळ आणून या भागात सोडण्यात आली. भविष्यात ही संख्या २०० पर्यंत वाढविण्यात येणार असल्याने वाघोबांना भरपूर भक्ष्य उपलब्ध होऊन त्यांची संख्या वाढणार आहे. वाघांसाठी नवे पाणवठेही तयार केले जात आहेत.‘सह्याद्री’च्या व्यवस्थापनाबद्दल मागील वेळेपेक्षा अव्वल गुणांकन यावेळी प्राप्त झाले आहे. एकंदर ४७ निकष त्यासाठी लावण्यात आले. सर्वसाधारण व्यवस्थापन, पुनर्वसन, संयुक्त वनव्यवस्थापन, पायाभूत सुविधांचा विकास, कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण, पर्यटन सुविधांमध्ये वाढ, असे हे निकष आहेत. (प्रतिनिधी)वाघांचे भक्ष्य वाढविण्याबरोबरच मानव-वन्यजीव संघर्ष टाळणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने जावळी तालुक्यातील सात गावांचे पुनर्वसन प्रस्तावित असून, क्षेत्र निवड पूर्ण झाली आहे. बफर झोनमध्ये परिस्थितीचा विकास करून संतुलन राखले जाईल.- एम. एम. पंडितराव,उपवनसंरक्षक (वन्यजीव),सह्याद्री व्याघ्र प्रकल्प