मडगाव : कोकणीतील ज्येष्ठ भाषाशास्त्रज्ञ आणि यंदाच्या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या डॉ. माधवी सरदेसाई यांचे सोमवारी पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ५२ होते. त्यांच्यामागे त्यांचे पती, ‘लोकमत’च्या गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक व दोन मुली - आसावरी व अदिती असा परिवार असून, मंगळवारी सकाळी ११ वाजता मडगावच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.गेले वर्षभर त्या दुर्धर अशा कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. पंधरवड्यापूर्वी त्यांना गोव्यात आणण्यात आले होते. त्यांचे पार्थिव त्यांचे बंधू आमदार विजय सरदेसाई यांच्या मडगावच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांच्या निधनाबद्दल साहित्य वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
साहित्य अकादमी विजेत्या माधवी सरदेसाई कालवश आज मडगावात अंत्यसंस्कार
By admin | Updated: December 23, 2014 05:30 IST