शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सहारा गुंतवणूकदारांनीच पैशासाठी कोर्टात जावे!

By admin | Updated: June 1, 2016 04:22 IST

‘गुंतवणूकदारांना रक्कम परत हवी असेल, तर त्यांनी माझ्या संपत्तीच्या विक्रीवरील प्रतिबंध हटविले जावेत, यासाठी न्यायालयात जावे, असे मी सुचवू इच्छितो

सोपान पांढरीपांडे,  नागपूर‘गुंतवणूकदारांना रक्कम परत हवी असेल, तर त्यांनी माझ्या संपत्तीच्या विक्रीवरील प्रतिबंध हटविले जावेत, यासाठी न्यायालयात जावे, असे मी सुचवू इच्छितो,’ असे सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांनी मंगळवारी ‘लोकमतशी’ बोलताना स्पष्ट केले. जवळपास ३ कोटी गुंतवणूकदारांना २४ हजार कोटी रुपये परत देण्यात असमर्थ ठरल्याच्या कारणावरून रॉय मार्च २०१४ पासून कारागृहात आहेत. आईच्या अंत्यविधीसाठी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ७ मेपासून चार आठवड्यासाठी पॅरोलवर सोडले आहे. क्रियाकर्म उरकल्यावर रॉय सध्या कठीण समयी सोबत असलेल्या गुंतवणूकदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी देशभरात ‘आभार यात्रा’ करीत आहेत. या यात्रेत रॉय चार्टर्ड विमानाने नागपुरात आले असता, ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला. लोकमत : सर्वोच्च न्यायालयाने २४ हजार कोटी परत करण्याचे निर्देश दिले आहेत. ही रक्कम उभारण्याची तुमची योजना काय?रॉय : हे प्रकरण न्यायालयात असल्याने त्यावर काहीही बोलू इच्छित नाही.लोकमत : पॅरोलमध्ये वाढ न झाल्यास तुम्ही जेलमध्ये परताल. अशा स्थितीत गुंतवणूकदारांचे भविष्य काय?रॉय : गेल्या २६ महिन्यांपासून मी कारागृहात आहेत. देशभरातील माझ्या संपत्तीच्या विक्रीवर न्यायालयाने प्रतिबंध लावले आहेत. रक्कम परत करण्याची माझी इच्छा आहे. प्रतिबंध दूर झाल्यास मला संपत्ती विकता येईल. जर गुंतवणूकदारांना परतावा हवा असेल, तर त्यांनी न्यायालयात जाऊन माझ्यावर असलेले प्रतिबंध हटवावेत.लोकमत : परतावा देण्याची तुमची जबाबदारी आहे. गुंतवणूकदारांनी न्यायालयात का जावे?रॉय : तिढा सुटण्याचा हा एक मार्ग आहे. प्रतिबंध दूर झाल्यास सध्या बंद असलेले व्यावसायिक उपक्रम सुरू होतील. लोकमत : जामिनासाठी न्यायालयाने तुम्हाला ५ हजार कोटी रोख आणि तेवढ्याच रकमेची बँक हमी भरण्यास सांगितले होते, पण तुम्ही भरू शकला नाहीत. त्याचे काय?रॉय : तुमच्याशी बोलताना आनंद होत आहे, पण तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की, हे प्रकरण न्यायालयात असल्यामुळे मी हे केले नाही. कृपया मला क्षमा करा. (या वेळी कारच्या सभोवताली असलेल्या बाउन्सर्सनी चालकाला कार पुढे नेण्यास सांगितले आणि संवाद इथेच संपला.)