शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

सहकाराला गरज संस्कारांची

By admin | Updated: January 19, 2016 03:43 IST

गेल्या काही वर्षांत सहकाराला स्वाहाकाराचे स्वरूप आले होते. साखर कारखानदारी टिकविण्यासाठी सहकारात संस्कारित भावनेने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नाशिक : गेल्या काही वर्षांत सहकाराला स्वाहाकाराचे स्वरूप आले होते. साखर कारखानदारी टिकविण्यासाठी सहकारात संस्कारित भावनेने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.विठेवाडी येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ३०व्या गळीत हंगामाचा त्यांच्या हस्ते प्रारंभ झाला. वसाका कारखाना कोमात गेलेल्या रुग्णांसारखा झाला होता. आ. राहुल अहेर यांनी पाठपुरावा करून तो सुरू केला. तो पुढेही चांगल्या पद्धतीने चालू राहिल्यास देशातील ते एकमेव उदाहरण ठरेल. कामगारांनीही एकेक पैसा वाचवून कारखान्याच्या उज्ज्वल भविष्याचे साक्षीदार झाले पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले, भविष्यात पाण्यासाठी संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. आताच रावणाचे पुतळे जाळले नसतील,तेवढे माझे पुतळे पाण्यावरून जाळले गेले आहेत, परंतु मीही शेतकऱ्याचा मुलगा असल्याने त्यांच्या भावना मला समजतात. जळगावमध्ये ठिबक सिंचनातून शेती फुलली आहे. इतरांनीही तसे प्रयत्न करावेत, असे महाजन म्हणाले. (प्रतिनिधी)गैरव्यवहार शोध मंत्री : जलसिंचन मंत्री महाजन यांनी त्यांचे पहिले वर्ष गैरव्यवहार शोधण्यातच घालविले. त्यामुळे त्यांना सिंचनमंत्री की गैरव्यवहार शोधणारे मंत्री म्हणावे, असा प्रश्न पडल्याचे फडणवीस यांनी सांगताच सर्वत्र हशा पिकला. सर्व जलसिंचन योजना पूर्ण होतील. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या संचालक मंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. त्या वेळी ते बोलत होते. शिर्डीच्या विमानतळाची उभारणी राज्य शासन स्वबळावर करीत आहे. २०१७-१८ हे साईबाबांचे समाधी शताब्दी वर्ष आहे. त्यादृष्टीने तेथील विमानतळाचे काम येत्या सहा महिन्यांत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. नागपूर येथील मिहान प्रकल्पाच्या कामाचा व या प्रकल्पांतर्गत बाधित झालेल्यांच्या पुनर्वसन आणि त्यांच्यासाठी आवश्यक मूलभूत सुविधांचाही आढावा मुख्यमंत्र्यांनी या वेळी घेतला. राज्यातील विविध जिल्ह्यांतील विमानतळांच्या कामाच्या प्रगतीचा तसेच त्यासाठी करण्यात आलेल्या भूसंपादन, निधी वितरण, सुविधा आदींचा आढावाही घेण्यात आला.