शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सागर बिल्डर्सला १० हजारांचा दंड

By admin | Updated: June 13, 2016 03:57 IST

सोसायटीला योग्य ती कागदपत्रे उपलब्ध करून न देणाऱ्या सागर बिल्डर्सला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने १० हजारांचा दंड सुनावला आहे

ठाणे : करारनाम्याप्रमाणे सोसायटीला योग्य ती कागदपत्रे उपलब्ध करून न देणाऱ्या सागर बिल्डर्सला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने १० हजारांचा दंड सुनावला आहे. सागर बिल्डर्सने मीरा-भार्इंदर येथील ४६५९० चौरस मीटर भूखंडावर इमारत क्रमांक ४० ते ५७ बांधून प्रकल्प विकसित केला. त्यातील सदनिकांची विक्री केली. मात्र, बिल्डरने सदनिकाधारकांची सहकारी संस्था स्थापन न केल्याने दोन इमारतींमधील सदनिकाधारक आणि दुकान गाळेधारकांनी एकत्र येऊन गोकूळगाव को-आॅप. हाऊसिंग सोसायटी स्थापन केली. त्यानंतर, त्यांनी सोसायटीच्या नावे इमारत आणि भूखंडांचे हस्तांतरणपत्र करून देण्याची मागणी केली. मात्र, बिल्डरने याला कोणताही प्रतिसाद न दिल्याने सागर बिल्डर्सच्या विरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली.४६,५९० चौरस मीटर क्षेत्रफळाचे हस्तांतरणपत्र दोन इमारती असलेल्या गोकूळगाव सोसायटीच्या नावे दिल्यास इतरांवर अन्याय होईल. त्यामुळे सर्व्हेअर एम.बी. राणे यांनी सोसायटीत येत असलेल्या भूखंडाची मोजणी करून सादर केलेल्या ड्राइंगनुसार भूखंडाचे हस्तांतरणपत्र द्यावे, असे मंचाने स्पष्ट केले. त्यामुळे सर्व्हे नं. २२२ (पी) आणि २२३ (पी) मधील अनुक्रमे १३६२ आणि १२०२ चौरस मीटर भूखंडांचे इमारतींसह हस्तांतरणपत्र सोसायटीला द्यावे. >कागदपत्रे, पुरावे यांची पडताळणी केली असता सागर बिल्डर्स यांनी दुसऱ्या डेव्हलपर्सकडून ४६,५९० चौरस मीटर क्षेत्रफळापैकी २,०६,८२१ चौरस फूट चटई निर्देशांक वापरण्यासाठी हक्क विकत घेतले. त्यानंतर, दोन इमारती ए ते डी विंगसह विकसित केल्या.