शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
विजय शाह यांना कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवले; काँग्रेस नेत्यांची निदर्शने; नेमप्लेटवर शाई फेकली
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
4
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
5
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
6
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
7
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
8
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
9
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
10
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
11
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
12
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
13
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
14
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
15
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
16
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
17
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
18
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
19
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
20
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे

जंजिऱ्यात पर्यटकांची सुरक्षा ऐरणीवर

By admin | Updated: May 18, 2016 02:50 IST

पुण्याच्या आबिदा इनामदार कॉलेजचे १४ विद्यार्थी बुडाल्याच्या घटनेमुळे येथील पर्यटन व्यवसायाला फटका बसला होता.

मुरुड-जंजिरा : पुण्याच्या आबिदा इनामदार कॉलेजचे १४ विद्यार्थी बुडाल्याच्या घटनेमुळे येथील पर्यटन व्यवसायाला फटका बसला होता. सध्या सुटी असल्याचे मुरुड-जंजिऱ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र अजूनही पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सरकारकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्याचे दिसून येत नाही. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक येत आहेत. त्यांना नियंत्रित करताना बोटमालकांची जीवघेणी कसरत सुरू आहे. दुसरीकडे काशीद समुद्रकिनारी खोल पाण्यात ओढले गेलेल्या पर्यटकांना सोमवारी स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाचविण्यात आले. त्यामुळे प्रशासन पर्यटकांच्या सुरक्षेसाठी केवळ कागदी घोडे नाचवत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. उन्हाळी सुटीमुळे पर्यटकांची मुरु ड-जंजिराच्या पर्यटनस्थळी विशेषत: जंजिरा किल्ला पाहायला गर्दी होत आहे. गेल्या काही पावसाच्या संकेतामुळे समुद्रही खवळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जंजिरा किल्ल्याजवळ उतरणे म्हणजे अनेकांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. शिडाची बोट एकाच वेळी सात-आठ फूट उंच झेपावते तर क्षणार्धात तेवढ्याच वेगाने खाली येते. अशा वेळी होडीतील कर्मचाऱ्यांकडून पर्यटकांना बकोट धरून अवजड सामानाप्रमाणे धरपकड करीत उतरवले जाते. यात महिला पर्यटकांवर अधिक नामुष्की येते. भयानक लाटांच्या तडाख्यांत पर्यटक उतरण्याचा प्रयत्न करताना बोट गडाच्या तटबंदीवर आदळते, तर कधी खडकाळ पायरीवर आदळते. अनेकदा पर्यटक पाण्यात पडण्याचे प्रकारही घडले आहेत. या परिस्थितीमध्ये पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पुरातत्त्व विभागाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. एकावेळी शेकडो पर्यटक किल्ल्याच्या सगळ्या पायरीवर गर्दी करीत असल्याने महिला, लहानगी मुले व ज्येष्ठांच्या जीवावरही बेतण्याची शक्यता नाकारत येत नाही. वर्षोनुवर्षे किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचे मत या ठिकाणी चिंचवडमधून आलेल्या अजय कुलकर्णी या पर्यटकाने मांडले. मुंबईहून आलेले मनजित सिंग यांनी लोक या ठिकाणी पर्यटनासाठी येतात. मात्र प्रशासनाकडून सुरक्षेबाबत कोणत्याही उपाययोजना दिल्या जात नसल्याने जीवाचा धोका उद्भवत असल्याचे त्यांनी सांगितले. वर्षभरामध्ये लाखो पर्यटक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येतात. त्यांची सुरक्षा प्रशासनाकडून राखली जात नाही. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ शौचालये बांधून अनेक वर्षे झाली, पण ही शौचालये सुरूच करण्यात आलेली नाहीत. मुरु ड-जंजिरा समुद्रकिनारा नैसर्गिकदृष्ट्या सुरक्षित किनारा आहे. पण काशीद समुद्रकिनारा निसर्गत: खोलगट आहे. दरवर्षी ओहोटीच्यावेळी पर्यटक समुद्रामध्ये खेचले गेल्याचे अनेक प्रसंग घडतात. सोमवारी अशाच प्रसंगामध्ये ग्रामस्थांनी बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवले.