शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

रुग्णालयांसाठी सुरक्षा अपुरी

By admin | Updated: June 30, 2016 04:26 IST

मुंबईतील शासकीय व महापालिका रुग्णालयांतील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी अवघे २८ शस्त्रधारी पोलीस नेमण्यात येणार आहेत.

मुंबई : मुंबईतील शासकीय व महापालिका रुग्णालयांतील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी अवघे २८ शस्त्रधारी पोलीस नेमण्यात येणार आहेत. मात्र रुग्णालयांचे आवार आणि रुग्णांची संख्या पाहता सुरक्षेसाठी नेमण्यात येणारे २८ शस्त्रधारी पोलीस अपुरे असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. शासकीय आणि महापालिका रुग्णालयांमधील डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी या ठिकाणी अहोरात्र पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. मात्र राज्य सरकारने जे. जे. सायन, सेंट जॉर्ज, नायर रुग्णालयांत दोन हवालदार नेमल्याची माहिती मंगळवारच्या सुनावणीत न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठाला दिली. बुधवारच्या सुनावणीत हंगामी महाधिवक्ता रोहित देव यांनी शासकीय व मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांतील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी २८ शस्त्रधारी पोलीस नेमण्यात येणार आहेत, अशी माहिती खंडपीठाला दिली. रुग्णालयांचे आवार आणि या ठिकाणी येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची संख्या पाहता राज्य सरकारने डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी २८ पोलीस अपुरे असल्याचे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. प्रत्येक रुग्णालयात कमीत कमी दोन शस्त्रधारी पोलीस, दोन हवालदार व महिला हवालदार असणे आवश्यक आहे, असे मत नोंदवत खंडपीठाने अधिक पोलीस नेमणार का, अशी विचारणा सरकारकडे केली. याबाबत पुढील आठवड्यात माहिती देण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)>बंधने घालण्यापेक्षा पोलीस ठेवाभेटण्याच्या वेळेवर आणि रुग्णांच्या नातेवाइकांवर बंधने घालून डॉक्टरांवरील हल्ले रोखता येणार नाहीत. मारहाण करणारे वॉर्डमध्ये किंवा आयसीयूजवळ नसतात, असे लोक रुग्णालयाच्या आवारात असतात. कमीत कमी दोन शस्त्रधारी पोलीस रुग्णालयाच्या बंदोबस्तासाठी ठेवलेत तर लोकांना पोलीस असल्याची जाणीव होईल, असे म्हणत खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी पुढील आठवड्यापर्यंत तहकूब केली. डॉक्टर बांधणार काळ्या फितीडॉक्टरांचे प्रश्न पंतप्रधानांपर्यंत पोहोचावेत यासाठी देशातील सर्व डॉक्टर एकत्रित येणार आहेत. १ जुलै ‘डॉक्टर्स डे’चे औचित्य साधून सर्व शासकीय रुग्णालयातील डॉक्टर काळ्या फिती बांधून काम करणार आहेत. देशातील सर्व डॉक्टरांना समान हक्क मिळावेत, म्हणून एकत्रित येण्याचे आवाहन आॅल इंडिया फेडरेशन गव्हर्नमेंट असोसिएशनने केले. कामाचे तास निश्चित असावेत, समान काम समान वेतन, सातवा वेतन आयोग, डॉक्टरांवरील हल्ले, सेवांतर्गत शिक्षणाच्या समस्या इत्यादी प्रमुख समस्यांसाठी डॉक्टर्स डे हा काळा दिवस म्हणून पाळला जाणार आहे.