शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सेफ्टी डोअर, खिडक्यांच्या जाळीसाठी परवानगीची गरज नाही

By admin | Updated: August 15, 2016 05:14 IST

घरांतील अंतर्गत-रचना बदलांबाबतच्या किरकोळ स्वरूपाच्या परवानग्या आॅनलाइन पद्धतीने देण्याचे महापालिकेने प्रस्तावित केले होते.

मुंबई : घरांतील अंतर्गत-रचना बदलांबाबतच्या किरकोळ स्वरूपाच्या परवानग्या आॅनलाइन पद्धतीने देण्याचे महापालिकेने प्रस्तावित केले होते. किरकोळ स्वरूपाच्या प्रस्तावांमध्ये जागांचे एकत्रीकरण करणे, दरवाजे काढणे, खिडक्यांचा आकार मोठा करणे, कार्यालयात केबिन तयार करणे, किचनमधील ओटयाची जागा बदलणे इत्यादी बाबींचा समावेश होतो. या प्रकारच्या परवानगी प्रक्रियांसाठी या पूर्वी सुटसुटीत पद्धत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. मात्र, आता या सुलभीकरणाच्या प्रस्तावाला आयुक्त अजय मेहता यांनी मंजूरी दिल्याने सर्व प्रक्रिया आॅनलाइन केल्यावर संबंधितांना त्वरित परवानगी मिळणे शक्य होणार आहे.इमारतीच्या अंतर्गत स्तरावरील ‘टेनंटेबल रिपेअर्स’ साठी परवानगीची गरज नसते. या बाबींमध्ये इमारतींच्या आरसीसी बाबींचे मजबुतीकरण करण्यासाठी गनायटींग करणे, प्लास्टरिंग करणे, रंगकाम करणे, फरशा बदलणे, संडासाचे भांडे बदलणे, विद्युत विषयक दुरुस्ती करणे आदी बाबींचा समावेश पूर्वीपासूनच आहे. यामध्ये आता महापालिकेच्या सुधारित धोरणानुसार ‘उघडता येईल असा घराचा सुरक्षा दरवाजा’ (सेफ्टी डोअर) आणि ‘खिडक्यांच्या जाळी’ (ग्रील) यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता घराला सेफ्टी डोअर बसविणे, खिडक्यांना जाळी बसविणे या बाबींसाठी महापालिकेची परवानगी घेण्याची गरज असणार नाही. तथापि, खिडक्यांना बसविण्याची जाळी ही आवश्यकतेनुसार सहजपणे उघडता येईल, अशा प्रकारची असणे बंधनकारक असणार आहे. (प्रतिनिधी)>भिंत हटविणे, अंतर्गत दरवाजे काढणे, खिडकीचा आकार मोठा करणे इत्यादी कामे करताना घर/सदनिका, दुकान, कार्यालये, औद्यागिक जागा इत्यादींबाबत इमारतीच्या मूळ बांधकामाला धक्का लागणार नाही; याची संबंधितांनी बांधकामावेळी खबरदारी घ्यावी.किचनमधील ओट्याची जागा बदलणे किंवा त्याची उंची कमी जास्त करणे. मात्र, हे करताना सांडपाणी व्यवस्थेमध्ये कोणताही बदल होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.सांडपाणी व मलनि:सारण व्यवस्थेमध्ये कोणताही बदल होणार नाही, याची काळजी घेत बाथरूम, टॉयलेट ब्लॉकमध्ये बदल करावा.>अंतर्गत रचना बदलांबाबतच्या किरकोळ स्वरूपाच्या प्रस्तावांबाबत आॅनलाइन प्रस्ताव सादर करताना त्यासोबत अर्जदाराचे घोषणापत्र असणे आवश्यक असणार आहे.ज्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. इमारत पूर्णत्त्वाचा दाखला देण्यात आलेला आहे, अशा इमारतींमध्ये परवानग्या आॅनलाइन देण्याचे प्रस्तावित आहे.