शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
2
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
3
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
4
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
5
Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद
6
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
7
VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...
8
अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी
9
"स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही..."
10
Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना
11
"विश्वासघातकी बदलणार नाहीत...", निवडणुकीपूर्वी भाजपाला धक्का; NDA तून आणखी एक मित्रपक्ष बाहेर पडला
12
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
13
उमेश कामत-प्रिया बापटच्या यशस्वी संसाराचं रहस्य काय? म्हणाले, "आम्ही वैयक्तिक स्तरावर..."
14
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’
15
बॅलेट पेपरवर आगामी निवडणुका घेणार; कर्नाटक सरकारचा निर्णय
16
देशभरात एकाच वेळी लागू होणार SIR, वादविवादादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
ट्रम्प टॅरिफमुळे GST मध्ये बदल केला का? अर्थमंत्र्यांचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, "गेल्या दीड वर्षांपासून..."
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया दुबईत पोहचली; आशियातील किंग होण्यासाठी ICC अकादमीत कसून सराव
19
"हिरोईन मटेरियल तू वाटत नाहीस...", असं म्हणत अभिनेत्रीला मालिकेतून दाखवला बाहेरचा रस्ता

सुरक्षित प्रवासासाठी ‘स्वरक्षा’

By admin | Updated: July 10, 2014 23:11 IST

महाराष्ट्रात पहिला प्रयोग: हायवे पोलिसांसाठी तंत्रज्ञान

बुलडाणा: महामार्गावरील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी व महामार्गावरील प्रवास अधिकाअधिक सुरक्षित होण्यासाठी राज्य महामार्ग वाहतूक पोलिस शाखेने आता स्वरक्षा हे मोबाईल तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. देशामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्रातील आठ विभागात हे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. अपघातस्थळी जखमी असो, वाहनचालक असो की उपस्थित नागरीक असो यांनी सदर मोबाइल अँप्लीकेशनवर क्लिक करताच तातडीन मदत उपलब्ध होणार आहे. अँप्लिकेशनमधील प्रेस फॉर इर्मजन्सी हे बटन दाबल्यास संबंधित व्यक्ती अडचणीत असल्याचा संदेश तिच्या घरच्यांना व महामार्ग पोलिस नियंत्रण जिल्हा कक्ष, येथे प्राप्त होईल. याकरिता पोलिस नियंत्रण कक्षात वायरलेस ऑपरेटर नियुक्त करण्यात येईल. या ऑपरेटर्सद्वारे ज्या मोबाइलवरून संकेत आला, त्या ठिकाणचे स्थळ समोरच्याकडून सांगितले गेले नसले तरी जीपीएसमार्फत शोधले जाईल.संबंधित स्थळ हे फिड केलेल्या नेटवर्कमध्ये नसल्यास त्या व्यक्तीच्या सिमकार्डच्या लोकेशनवरून त्यांचा शोध घेत त्याच्यापयर्ंत मदत पोहोचवली जाईल. अवघ्या पाच ते दहा मिनिटांतच जखमींना रुग्णवाहिकेसह मदत करण्याचा प्रयत्न या यंत्रणेद्वारे होणार आहे. यासाठी नियंत्रण कक्षातून संबंधित सर्वांशी संपर्क साधून घटनास्थळी मदत पोहोचली की नाही, याची खात्री ही नियंत्रण कक्षाकडून केली जाणार आहे. (प्रतिनिधी)** महाराष्ट्रात पहिला प्रयोगमहामार्ग पोलिस शाखेचे राज्यभरात पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे, पनवेल, अमरावती, व नागपुर असे आठ विभाग आहेत. या आठ विभागात येणा-या महामार्गावरील प्रत्येक पोलिस स्टेशन, अँम्ब्युलन्स, फायर बिग्रेड, हायवे पेट्रोल, जिल्हा रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालये तसेच खाजगी रुग्णालयांची फोन नंबर व पत्त्यासहीत माहिती या अँप्लिकेशनमध्ये दिलेली आहे. देशात प्रथमच अशा प्रकारचे अँप्लिकेशन महाराष्ट्र हायवे पोलिसांनी मोबाईलवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.** गॅरेज, रुग्णालयांची माहिती उपलब्ध या अँप्लिकेशनमध्ये वाहनाला अपघात झाला, पंर झाले, बिघाड झाल्यास नजीकच्या गॅरेजचा पत्ता, क्रमांक आहेत. त्याचबरोबर महामार्ग पोलिसांचे टॅप, नजीक पोलिस ठाण्यांचे क्रमांक, खासगी रुग्णालये, रुग्णवाहिकांचे क्रमांकदेखील देण्यात आले आहेत.