शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सदोष मनुष्यवधाची शिक्षा रद्द

By admin | Updated: July 19, 2015 02:05 IST

कोल्हापूर येथे १९८९मध्ये घडलेल्या विषारी दारूकांडाप्रकरणी तेथील सत्र न्यायालयाने दोन आरोपींना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासाठी ठोठावलेली १० वर्षांची शिक्षा उच्च न्यायालयाने

मुंबई : कोल्हापूर येथे १९८९मध्ये घडलेल्या विषारी दारूकांडाप्रकरणी तेथील सत्र न्यायालयाने दोन आरोपींना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासाठी ठोठावलेली १० वर्षांची शिक्षा उच्च न्यायालयाने अपीलात रद्द केली. ही याचिका प्रलंबित असताना आरोपींचा मृत्यू झाला. मात्र आरोपींनी पीडितांना जीवे मारण्याच्या हेतूनेच विषारी दारू विकली होती हे सिद्ध झालेले नाही, असेही न्या. अभय ठिपसे यांनी सात पानी निकालपत्रात नमूद केले आहे.शेवंताबाई राऊत व जयपाल माने अशी या आरोपींची नावे आहेत. २०-२३ मे १९८९ या काळात त्यांच्याकडील दारू पिऊन १३ जणांचा बळी गेला. या प्रकरणी पाच जणांवर सदोष मनुष्यवधासह इतर आरोप ठेवण्यात ठेवले. कोल्हापूर सत्र न्यायालयाने पाचपैकी दोन आरोपींना सदोष मनुष्यवधासाठी १० वर्षांची शिक्षा ठोठावली. याविरोधात या आरोपींनी उच्च न्यायालयात अपील याचिका दाखल केली होती. सदोष मनुष्यवधाच्या आरोपासाठी शिक्षा ठोठावताना आरोपीचा हेतू हत्या करण्याचाच होता हेही सिद्ध होणे आवश्यक आहे. हे या प्रकरणात सिद्ध झालेले नाही. तेव्हा आरोपींना सदोष मनुष्यवधासाठी ठोठावलेली शिक्षा रद्द केली जात आहे. ही शिक्षा ठोठावताना आरोपींना काही दंड ठोठावला असल्यास तो त्यांच्या नातलगांना परत करावा, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.