शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

साधुग्राम दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर!

By admin | Updated: July 7, 2015 01:41 IST

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात घातपात होण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच साधूंचे महत्त्वाचे आखाडेही दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे़

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात घातपात होण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच साधूंचे महत्त्वाचे आखाडेही दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे़ या पार्श्वभूमीवर तपोवनातील दिगंबर आखाड्याची मुंबईच्या ‘फोर्स वन’ या कमांडो पथकाने रेकी केली़ दहशतवाद्यांचे टार्गेट आता नाशिकही असल्याने साधू-महंत धास्तावले आहेत. तपोवनात दिगंबर आखाड्याचे देशातील मुख्य स्थान आहे. या आखाड्याची नाशिकमधील सूत्रे सध्या महंत रामकिशोरदास महाराज यांच्याकडे आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबईतील फोर्स वन कमांडो पथकाच्या अधिकाऱ्यांनी रामकिशोरदास यांची भेट घेतली व त्यांना आखाड्याची रेकी करण्याबाबतचे पत्र दिले. त्यानुसार दुसऱ्या दिवशी साध्या वेशातील एक अधिकारी व चार कमांडोंनी आखाड्याची रेकी केली. आखाड्याचे एकूण क्षेत्रफळ, त्यातील बांधकाम, रचना, सर्व खोल्या, पाण्याच्या टाक्या या सर्व बाबींची मापे घेण्यात आली. आखाड्याच्या इमारतीच्या अगदी बारीकसारीक भागांचीही छायाचित्रे घेण्यात आली. सुमारे तासभर झालेल्या या पाहणीवेळी महंत रामकिशोरदास उपस्थित नव्हते. आखाड्यात आल्यानंतर अन्य साधूंनी त्यांना ही माहिती दिली. त्यांनी ही बाब सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली; मात्र त्यांनाही याबाबत कल्पना नव्हती. त्यामुळे रेकी करणारे खरोखर फोर्स वनचे अधिकारी होते की बनावट, याबाबत शंका उपस्थित करण्यात आली. नंतर तो वाद मिटला.