शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
3
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
4
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
5
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
6
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
7
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
8
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
9
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
10
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
11
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
12
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
13
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
14
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
15
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
16
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
17
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
18
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
19
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
20
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे

जमिनीच्या कुशीत रामनरेशदास महाराजांची साधना

By admin | Updated: August 23, 2015 00:08 IST

सिंहस्थ कुंभमेळ्यात साधुग्राम परिसरात एकापेक्षा एक सरस योगी, साधूंची आश्चर्यकारक साधनेची लीला बघावयास मिळत आहे. जमिनीत ११ फूट खड्डा करून त्यामध्ये किमान महिनाभर

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात साधुग्राम परिसरात एकापेक्षा एक सरस योगी, साधूंची आश्चर्यकारक साधनेची लीला बघावयास मिळत आहे. जमिनीत ११ फूट खड्डा करून त्यामध्ये किमान महिनाभर रामनरेशदास महाराज तपश्चर्येत मग्न राहणार आहे.शुक्रवारपासून त्यांची साधना सुरू झाली आहे. तपोभूमीत प्रभू रामचंद्रांनी वनवासकाळात वास्तव्य केल्याने तपोवनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तपोवनात फेरफटका मारताना एखादे साधू महाराज झाडाला टांगलेल्या झोक्याच्या आधाराने एका पायावर उभे राहिल्याचे दिसतात, तर कोणी जमिनीपासून उंच मचाणावर बसलेले तर कोणी वर्षानुवर्षांपासून उभेच असल्याचे चित्र दिसते. त्यापैकीच एक नरेंद्रदास महाराज. त्यांचे नुकतेच गुजरातहून तपोभूमीत आगमन झाले आहे.त्यांनी शुक्रवारपासून जमिनीच्या कुशीत तपश्चर्येला सुरुवात केली आहे. त्यांची ही अनोखी साधना बघण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी तपोवनातील राजेंद्र मळा परिसरात भाविकांची रीघ लागली आहे. श्री १००८ संत शिरोमणी तपस्वी श्री नारायणदास महाराज यांचे शिष्य तपस्वी लक्ष्मीदास महाराजांचे रामनरेशदास महाराज शिष्य आहे. ज्याप्रमाणे सीतामातेने जमिनीच्या कुशीत समाधी घेतली होती.नाशिकमध्ये चतु:संप्रदायच्या ध्वजावरून मतभेदचतु:संप्रदाय खालशाच्या ध्वजारोहणापूर्वी इष्टदेवतेच्या मंदिरासमोर पंचरंगी दिगंबर अनी आखाड्याचा ध्वज फडकविण्याची मागणी काही साधू महंतांनी केल्याने वादविवाद होऊन विलंबाने ध्वजारोहण झाले.चतु:संप्रदाय आखाड्याची ध्वज इष्टदेवता हनुमाचे प्रतीक असते. त्यामुळे कुंभमेळ्यात चतु:संप्रदाय खालशाची ध्वजा लाल रंगाची असते, असा दावा चतु:संप्रदाय आखाड्यातील साधू-महंतांकडून करण्यात आला. चतु:संप्रदाय खालशाचे ध्वजारोहण अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास व खालशाचे महंत ब्रह्मऋषी बर्फानी दादाजी, महंत फुलडोलदास बिहारी, महंत रामलखनदास, महंत रासबिहारीदास यांच्या हस्ते झाले. चतु:संप्रदाय खालशात पंचरंगी धर्मध्वज खालशाच्या ध्वजारोहणापूर्वी फडकायला हवा, असा विचार साधू-महंतांकडून व्यक्त करण्यात आला होता. खालशाची ध्वजा लाल असून, त्याला सोनेरी किनार असते. खालशामध्ये धर्मध्वजा लाल रंगाची फडकविण्याची परंपरा आहे. पंचरंगी ध्वजा फडकविली जात नाही. सूचना करीत आहेत, त्यांनी पूर्ण माहिती आणि इतिहास जाणून घ्यावा, असे महंत फुलडोलदास बिहारी यांनी सांगितले.