शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

साडुचा खून करून मुतदेह कचऱ्यात जाळणारे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2016 17:52 IST

व्यवसायासाठी हात उसने घेतलेले चार लाख परत द्यायला लागू नयेत याकरिता तगादा लावणाऱ्या साडूचा गळा आवळून खून करीत त्याचा मृतदेह कचऱ्यात लपवून नंतर जाळून टाकण्यात आला.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. २३ : व्यवसायासाठी हात उसने घेतलेले चार लाख परत द्यायला लागू नयेत याकरिता तगादा लावणाऱ्या साडूचा गळा आवळून खून करीत त्याचा मृतदेह कचऱ्यात लपवून नंतर जाळून टाकण्यात आला. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

गणेश पांडुरंग पोटे ( वय 37, रा. धनगर वाडा, साखळी पीर तालमीजवळ, नाना पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अशोक मोहन गुणगे (वय 32, रा. डोके तालीम मागे, नाना पेठ) आणि कुमार तोरगल (रा. 14, नाना पेठ) यांना अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोटे आणि गुणगे व तोरगल तिघेही साडू आहेत. पोटे यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत अल्पना टॉकीज जवळील मच्छि मार्केट येथील कचरा पेटीमध्ये आढळून आला होता. शवविच्छेदनामध्ये पोटे यांचा मृत्यू गळा दाबून तसेच मारहाण करून जाळण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता हा गुन्हा साडू गुणगे याने केला असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुणगे याला अटक करण्यात आली.

गुणगे याने पोटे यांच्याकडून चार लाख रुपये व्यवसायासाठी हात उसने घेतले होते. हे पैसे गुणगे याने मौजमजेमध्ये उडवले होते. या पैसांसाठी पोटे तगादा लावत होते. त्यासाठी पोटे यांचे कुटुंबीय गावी गेले असताना त्यांना दारू पाजली. त्यांचा दोघांनीं शनिवारी रात्री गळा आवळून खून केल्यावर मृतदेह कचरा पेटीत दडवून ठेवला. रविवारी रात्री गुणगे याने परत तेथे जाऊन कचरा पेटवून मृतदेह जाळून टाकला होता. हि घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली होती.