मुंबई : ज्येष्ठ अभिनेते व समाजसेवक सदाशिव अमरापूरकर यांची प्रकृती चिंताजनक आहे. फुप्फुसाला संसर्ग झाल्याने अंधेरीच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 63 वर्षाच्या अमरापूरकर यांची श्वसनसंस्था योग्यरीतीने कार्यरत नाही. त्यांची प्रकृती स्थिर व्हावी, म्हणून तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. तूर्तास त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. मधुमेह बळावल्याने त्यांच्या फुप्फुसाला संसर्ग झाला आहे. त्यांना लवकरात लवकर आराम पडावा, अशी आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करीत असल्याचे त्यांची मुलगी रीमा यांनी सांगितले.