शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सदाभाऊ म्हणजे संघटना नव्हे!

By admin | Updated: May 3, 2017 03:23 IST

कृषीमंत्री सदाभाऊ खोत म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना नसून, ते संघटनेचे एक कार्यकर्ते आहेत. त्यांना शेतकऱ्यांची गरज असेल

सांगली : कृषीमंत्री सदाभाऊ खोत म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना नसून, ते संघटनेचे एक कार्यकर्ते आहेत. त्यांना शेतकऱ्यांची गरज असेल तर,४ मे रोजी कोल्हापुरात निघणाऱ्या मोर्चात त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केले. दरम्यान सदाभाऊंना संघटनेच्या सर्व पदातून मुक्त केल्याचेही त्यांनी जाहीर केले.ते पुढे म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने ठराव घेऊनच सदाभाऊंना मंत्रिमंडळात पाठविले आहे. ते राज्यमंत्री असल्यामुळे त्यांचे अधिकार कमी आहेत. हे जरी खरे असले तरी, त्यांनी भाजप सरकारचे उदोउदो करण्याची काहीच गरज नाही. मित्रपक्षाचे मंत्री कसे वागतात तसे त्यांनी वागावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना साखर कारखाने विक्री घोटाळे आणि जलसिंचन घोटाळ्याबद्दल बैलगाडीभर पुरावे असल्याची वल्गना करीत होते. सत्तेवर येताच त्यांना त्यांच्या भाषणांचा विसर पडला आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय ते घेत नाहीत. या सरकारचे कौतुक सदाभाऊंनी करण्याची काहीच गरज नाही. काहीवेळा ते उत्साहाच्या भरात भाजपबद्दल बोलत असतीलही; पण त्यांना सरकारच्या कौतुकाचा सोहळा थांबविण्याचाही आम्ही सल्ला देऊ, अशी बोचरी टीकाही शेट्टी यांनी केली.सदाभाऊ मंत्री झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सर्व पदे त्यांच्याकडून काढून घेतली आहेत. त्यांच्याकडे सध्या कोणतेही पद नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आता प्रा. डॉ. प्रकाश पोकळे आहेत. दि. ४ मे रोजी कोल्हापूर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. उसाला दुसरा हप्ता ५०० रुपये मिळावा, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, यासह अन्य मागण्या आहेत.(प्रतिनिधी)प्रतिटन ५०० रुपये द्या, नाही तर आंदोलन साखर कारखान्यांचे गळीत हंगाम चालू झाले, त्यावेळी साखरेला क्विंटलला २८०० रुपये दर होता. यामध्ये एक हजाराची वाढ होऊन आज ३८०० रुपये क्विंटल साखरेचा दर झाला आहे. साखरेच्या वाढीव दराचा शेतकऱ्यांना लाभ झालाच पाहिजे. यामध्ये साखर कारखानदार शेतकऱ्यांवर उपकार करीत नाहीत. दुसरा हप्ता म्हणून प्रतिटन ५०० रुपये दर दिला पाहिजे. दरवाढ दिली तर ठीक, नाही तर दि. ४ मेनंतर सरकारच्याविरोधात रस्त्यावरची लढाई लढण्यास आम्ही सज्ज आहोत, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.