शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबीयांसह सचिनची जंगलसफारी

By admin | Updated: February 21, 2016 01:17 IST

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शनिवारी पहाटेच्या सुमारास उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात भ्रमंती केली. वन विभागानेही सचिनचा दौरा अतिशय गुप्त ठेवला.

- अभय लांजेवार,  उमरेडमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शनिवारी पहाटेच्या सुमारास उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात भ्रमंती केली. वन विभागानेही सचिनचा दौरा अतिशय गुप्त ठेवला. पत्नी अंजली, मुलगा अर्जुन यांच्यासह सचिन शुक्रवारी रात्री नागपुरात दाखल झाला. उमरेडनजीकच्या एका हॉटेलात त्यांचा रात्री मुक्काम होता. पहाटेच्या सुमारास तेंडुलकर कुटुंबीयांनी वनविभागाच्या विश्रामगृहालगत असणाऱ्या प्रवेशद्वारातून अभयारण्यात प्रवेश केला. सचिनने अभयारण्यात भ्रमंतीचा एकदा नव्हे, तर दोनदा आनंद लुटला.मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये पोलीस बंदोबस्त होता. पहाटेपासून दुपारी १२ वाजतापर्यंत सचिन आणि त्याच्या कुटुंबीयांनी जंगल भ्रमंती केली. त्यानंतर दुपारी ३ वाजताच्या सुमारास सचिन पुन्हा अभयारण्यात गेला. शनिवारी रात्री त्याचा येथेच मुक्काम असल्याची माहिती आहे. जंगलभ्रमंतीसाठी आलेल्या पर्यटकांना सचिन दिसताच ‘वाघ दिसला नाही तरी चालेल,’ अशा प्रतिक्रिया दिल्या. काळे- पांढरे पट्टे असलेला टी शर्ट, निळ्या रंगाची जिन्स आणि डोक्यावर हॅट घातलेला सचिन बघताच सर्वांच्या नजरा त्याच्यावरच खिळून होत्या. काही गाईड आणि जिप्सी चालकांनी त्याच्यासोबत छायाचित्र काढून घेतले. उद्धव ठाकरेंनी घेतले व्याघ्रदर्शन...शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहपरिवार ताडोबा भ्रमंतीसाठी आले आहेत. चिमूर तालुक्यातील कोलारा गेटमधून त्यांनी ताडोबात प्रवेश केला. भ्रमंतीदरम्यान येनबोडी येथे त्यांना वाघाचे दर्शन झाल्याची माहिती एका गाईडने ‘लोकमत’ला दिली. ते ताडोबातीलच घोसरी येथे मुक्कामी असल्याचीही माहिती आहे.