ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 26 - तळेगाव दाभाडे येथील सचिन शेळके खून प्रकरणातील भांबोली ( ता. खेड ) येथील नितीन वाडेकर ( वय २५ ) या आरोपीला चाकण पोलिसांनी नासिक फाटा, पुणे येथे सापळा लावून जेरबंद केले. गुप्त खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार काल ( दि. २५ ) सकाळी साडे आकाराच्या सुमारास तो रिक्षातून नासिक फाटा येत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश ढवाण व पोलीस नाईक जरे यांनी त्याला सापळा लावून पकडले व तळेगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. खून झाल्यापासून तो फरार झाला होता. फेसबुक व व्हाट्स ऍप ग्रुपवर अनेक तरुणांचे ग्रुप असून अशा ग्रुपवरून हे तरुण दहशत पसरवीत असल्याचे पोलिसांनी सांगितले असून या प्रकरणात आणखी काही नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे.
सचिन शेळके खून प्रकरणातील आरोपीला अटक
By admin | Updated: October 26, 2016 18:18 IST