शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सचिन पाडावेचा रेल्वे करणार गौरव

By admin | Updated: November 12, 2014 23:31 IST

बाळासाहेब निकम : तडा गेलेल्या रुळामुळे होणारा रेल्वे अपघात टाळला...

रत्नागिरी : करबुडे बोगद्यापासून काही अंतरावर तडा गेलेल्या रूळामुळे होणारा भयानक अपघात प्रसंगाधानामुळे टळला. त्यामुळे हजारो प्रवाशांचे प्राण वाचविणाऱ्या ट्रॅकमन सचिन पाडावे यांचा कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागाकडून येत्या दोन - तीन दिवसात सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांनी दिली.ही घटना रविवारी घडली. करबुडे बोगद्यापासून काही अंतरावर तडा गेलला रूळ पाहताच ट्रॅकमन पाडावे यांची तारांबळ उडाली. त्यानी हा संदेश रेल्वेस्थानकापर्यंत पोहोचवण्यासाठी जिवाचा आटापिटा केला. मात्र, तोपर्यंत कोकणकन्या उक्षी स्थानकातून सुटली होती. ७५ किलोमीटर तासी वेगाने धावणाऱ्या या गाडीला करबुडेच्या या तुटलेल्या रूळाच्या आधी थांबविले नाही तर अनर्थ घडेल, हजारो प्रवाशांच्या जिवाला धोका आहे, काहीतरी करायलाच हवे, एवढीच जाणीव पाडावे यांना झाली. दुसऱ्याच क्षणी कोणताही विचार न करता ते उक्षी बोगद्याच्या दिशेने धावत सुटले. त्यानी लाल सिग्नल देणारी बॅटरी कोकणकन्या एक्सप्रेसवर मारत धोक्याचा इशारा दिला. कशीतरी धडधड आवाज करीत ही एक्सप्रेस थांबली. घटना कळताच हजारो प्रवाशांनी आपण केवढ्या भयानक प्रसंगातून वाचलो, हे कळताच सुटकेचा निश्वास टाकला. कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या ट्रॅकमन पाडावे यानी प्रसंगावधान राखून हजारो प्रवाशांचे प्राण वाचवले. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कोकण रेल्वे प्रशासनाने त्यांचा सत्कार करावा, अशी मागणी होत होती. अखेर त्या मागणीचा विचार करून कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागातर्फे त्याला गौरविण्यात येणार आहे.कोकण रेल्वेचा ‘फाऊंडेशन डे’ १५ आॅक्टोबरला साजरा केला जातो. यावेळी उल्लेखनीय कार्य करणारे कर्मचारी, अधिकारी यांना गौरविण्यात येते. यात पाडावे यांच्या सत्काराबाबत नक्कीच विचार होईल, असे निकम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)करबुडे बोगद्यानजीक रुळावर तडा गेल्याने होणारा रेल्वे अपघात सचिन पाडावे यांच्यामुळे टळला. याबद्दल आमदार उदय सामंत यांच्याहस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.