शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

सबनीस, जाखडे यांचे अर्ज दाखल

By admin | Updated: September 1, 2015 01:20 IST

पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस आणि प्रकाशक अरुण जाखडे यांनी सोमवारी अर्ज दाखल केले

पुणे : पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस आणि प्रकाशक अरुण जाखडे यांनी सोमवारी अर्ज दाखल केले.ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ, डॉ. रवींद्र शोभणे, डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी यापूर्वी अर्ज दाखल केले आहेत. जाखडे यांच्या अर्जावर सूचक म्हणून श्रीधर माडगूळकर यांची स्वाक्षरी असून, डॉ. सबनीस यांच्या अर्जावर के.रं. शिरवाडकर यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केली आहे. कोल्हापुरातील दक्षिण साहित्य संघाचे चंद्रकुमार नलगे मंगळवारी पुण्यात अर्ज भरण्याची शक्यता आहे.चांगल्या लेखकाला चांगला प्रकाशक मिळत नाही, चांगल्या प्रकाशकाला चांगला लेखक मिळत नाही, अशी सध्या परिस्थिती आहे. वाङ्मयीन क्षेत्रात चैतन्य निर्माण व्हावे, यासाठी अध्यक्षपदाची निवडणूक लढवित असल्याचे अरुण जाखडे यांनी सांगितले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अर्ज दाखल केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.साहित्य प्रांतातील हा नवा प्रयोग नेटाने स्वीकारला आहे. कलाविष्कारात सर्व घटकांना सन्मानित करण्यात आले आहे, पण यापूर्वी एकाही प्रकाशकाला अध्यक्षपदासाठी संधी मिळालेली नाही. घुमान साहित्य संमेलनादरम्यान साहित्य परिषद आणि प्रकाशक यांच्यात वैचारिक मतभेद होते. तात्त्विक वाद सोडविण्यासाठी हे एक व्यासपीठ आहे, असेही ते म्हणाले.राजकारणी व्यक्तींच्या शब्दावर विश्वास ठेवावा की नाही, अशी सध्या परिस्थिती आहे. दुभंगलेला महाराष्ट्र, अस्वस्थ तरुणाई याचा विचार फक्त साहित्यिकच करू शकतो, याचसाठी संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवित असल्याचे प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांनी अर्ज दाखल केल्यानंतर सांगितले.